Dombivli: डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेच्या संयुक्त विद्यमाने रिक्षा चालकांसाठी सोमवारी पूर्वेकडील इंदिरा चौकात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
हे मोफत वैदयकीय तपासणी शिबिर मोर्विका साडी सेंटर समोर, इंदिराचौक, डोंबिवली (पूर्व) येथे आयोजित केले होते. सदर तपासणी शिबिराचे उदघाटन कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा सेना कल्याण जिल्हाध्यक्ष जितेन पाटील, शिवसेना विधानसभा संघटक तथा सचिव बंडू पाटील, डोंबिवली शिवसेना सचिव संतोष चव्हाण, शिवसेना वैद्यकीय कक्ष कार्याध्यक्ष राम राऊत, कविता गावंड, केतकी पोवार, सुदाम जाधव, विलास राठोड, प्रशांत चव्हाण, संभाजी राठोड, रवी जाधव, विनोद राठोड, संतोष तलासीकर आदी मान्यवर उपस्थित होते.या मोफत तपासणी शिबिरात ईसीजी, नेत्र, मणक्याची व कंबरेची तपासणी, शरीरातील हाडांची कैल्शियम स्थिती, मोतीबिंदू अशा आजाराकरीता रिक्षा चालकांनी गर्दी केली होती. यासाठी शिबिरासाठी मंगेश चिवटे, राम राऊत, आमदार कार्यालय (वैद्यकीय विभाग) जनसंपर्क प्रतिनिधी वैभव विलास राणे यांनी विशेष मेहनत घेतली.