भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसील कार्यालय कल्याण यांच्या सौजन्याने डोंबिवली (Dombivli) पश्चिम येथील मराठा समाज हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शासकीय समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आले. हे शिबिर 2 जून ते 4 जूनदरम्यान संपन्न झाले.
या शिबिरात शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शासकीय दाखले, ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्रे तसेच विविध महत्त्वाचे दस्तावेज तत्काळ उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, रहिवासी दाखला तसेच इतर शैक्षणिक व सामाजिक प्रमाणपत्रांचा समावेश होता.
शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधांचा लाभ घेतला. एकाच ठिकाणी सर्व शासकीय सेवा मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी माजी नगरसेविका विद्या म्हात्रे, मनीषा राणे, माजी नगरसेवक राजन आभाळे, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मितेश पेणकर, डोंबिवली पुढचे मंडळा अध्यक्ष प्रिया जोशी, दिनेश जाधव, समीर चिटणीस, मयुरेश शिर्के, कृष्णा परुळेकर, पवन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच उपविभागीय अधिकारी कल्याण विश्वास गुजर, तहसीलदार सचिन शेजाळ, रवींद्र जमदारे, अरुण कासार यांचीही उपस्थिती लाभली.