Dombivli: फेरीवाल्यांचे ‘पार्किंग फलक हटाव – फेरीवाला बचाव’ आंदोलन

माय मराठी
1 Min Read

डोंबिवली (Dombivli) (प्रतिनिधी – शंकर जाधव)

कष्टकरी हॉकर्स आणि भाजी विक्रेता युनियन (Dombivli) तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हातगाडी-पथारी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात शुक्रवार, १६ मे रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.

“पार्किंग फलक हटाव, फेरीवाला बचाव” या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, रस्त्यांवर पार्किंगचे फलक लावल्यास वाहनांसाठी जागा निर्माण होईल, पण मग फेरीवाले कुठे बसणार?”

डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रोडवर पी-1 आणि पी-2 पार्किंगसाठी लावलेले फलक आणि त्यासंदर्भातील २०१७ मधील अधिसूचना रद्द करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. फेरीवाल्यांचे म्हणणे आहे की, ज्या ठिकाणी फेरीवाले बसत नाहीत, अशा ठिकाणी पार्किंग फलक लावल्यास त्यांना हरकत नाही.

फेरीवाल्यांचे उपजीविकेचे रक्षण आणि पथविक्रीचे योग्य नियमन व्हावे, तसेच पथविक्रेता (जीविका संरक्षण व विनियमन) अधिनियम २०१४ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी केली.

या आंदोलनात बबन कांबळे यांच्यासह फेरीवाला महिला समितीच्या आशा मगरे, रेश्मा कुरेशी, दिपक भालेराव, अभयलाल दुबे, राजू गुप्ता, नेईम खान, अष्टपाल कांबळे आणि सुनील पाचपुंजे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more