राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 9 फेब्रुवारी व कल्याण लोकसभा मतदार संघांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या 4 फेब्रुवारी रोजी वाढदिवसानिमित्त डोंबिवली (Dombivli) पूर्वेकडील होरीझॉन सभागृहात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहित्य वाटप करण्यासाठी तपासणी शिबीर आयोजित केले होते.
यानिमित्त आरोग्याकरता पंधरावडा म्हणून त्याच्याच एक भाग म्हणून असे शिबीर भरविले होते.यावेळी आमदार राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम,एकनाथ पाटील,संतोष चव्हाण, बंडू पाटील,दत्ता वझे,विवेक खामकर,शीतल लोके,कविता गांवड,प्रकाश माने,दिनेश शिवलकर,विकास देसले,सुदाम जाधव,दत्ता पवार,सागर मधे,संतोष चव्हाण,सतीश मोडक,वैभव राणे, संतोष तळासेकर,धर्मराज शिंदे,गजानन व्यापारी,संदेश पाटील,सागर जेधे,सागर दुबे,केतकी पोवार,बालन मोरे,अवनी शर्मा,अस्मिता खानोलकर, संध्या शिर्के, प्रशांत प्रधान, शीतल धुरी आदी उपस्थित होते.
या शिबिरात दिव्यांगसाठी आवश्यक कागदपत्र, अपंगत्व दर्शविणारे छायाचित्र, आधारकार्ड, अपंगत्व प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, दृष्टीहिंनासाठी शैक्षणिक नाव नोंदणी पुरावा शिबिरात देण्यात आले. तर आरव्हीवाय योजनेतरर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे साहित्य व्हीलचेअर, कमोड सह व्हीलचेअर, कमोड, कुबड्या, चालण्यासाठी काठी, ट्रायपॉड,टेट्रापॉड,चष्मा, श्रवणयंत्र,ग्रीवा कॉलर, गुडघा ब्रेस, डेन्चर आणि एलएस बेल्ड आदी साहित्य दिले जाते.
आमदार मोरे यांनी त्या अपंग व्यक्तीला नोकरी लावण्याचे दिले आश्वासन…
डोंबिवली पूर्वेकडील आजदेगाव येथील चंद्रभान पाटील या अपंग व्यक्तीने शिबीरात आमदार राजेश मोरे यांची भेट घेतली. पाटील यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीबाबत आमदार मोरे यांना माहिती देत नोकरी मिळवून दिल्यास आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल अशी विंनती केली. यावर आमदार यांनी पाटील यांना नोकरी लावण्याचे आश्वासन दिले.