शंकर जाधव (Dombivli)
आमदार राजेश मोरे (Dombivli) यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ
कल्याण लोकसभा मतदारसंघातील घराघरात पाईपलाइनद्वारे घरगुती गॅस पोहोचवण्याचा संकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आणि तो यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. २०१४ पासून अंबरनाथ ते कळवा या परिसरातील अनेक भागांमध्ये गॅस पुरवठा सुरू करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. डोंबिवली पूर्व भागातही गॅस पुरवठा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे.
आता, त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व प्रयत्नांमुळे डोंबिवली पश्चिमेतही घरगुती गॅस पुरवठा सुरू करण्यात यश आले आहे. रेल्वे रुळांखाली स्टील पाईपलाइन टाकण्यासाठी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक परवानगी मिळवून दिली. या कामास गती देण्यासाठीही त्यांनी विशेष लक्ष दिले.
या योजनेअंतर्गत, आज श्रीकर कृपा सोसायटी येथे घरगुती गॅस पुरवठ्याचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला. हा शुभारंभ कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार करण्यात आला.
या प्रसंगी माजी नगरसेविका मनिषा धात्रक, डोंबिवली शहर सचिव संतोष चव्हाण, पश्चिम शहर संघटक केतकी पोवार, उपजिल्हा संघटक किरण मोंडकर, संपर्क संघटक कविता गावंड, पूर्व संघटक स्वाती हिरवे, युवासेना प्रतिनिधी राहुल म्हात्रे, संजय पावशे तसेच शिवसेना-भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
You Might Also Like
ही योजना डोंबिवली पश्चिमेकडील नागरिकांसाठी एक मोठी सुविधा ठरणार असून, सुरक्षित व सतत गॅस पुरवठ्यामुळे त्यांचे जीवन अधिक सुलभ होणार आहे.