डोंबिवली (Dombivli) ( शंकर जाधव )
सहायक आयुक्त कुमावतांनी केली कारवाई
डोंबिवली (Dombivli) पूर्वेकडील ‘ग’प्रभाग क्षेत्र हद्दीतील स्टेशनबाहेरील जागेवर फेरीवाल्यांवर सहायक आयुक्त संजय कुमावते हे पथकासह कारवाई करत असताना काही फेरीवाल्यांनी आपले सामान पुलाखालील अंधाऱ्या जागेत लपवत होते.कुमावत यांनी हा प्रकार पहिला असता फेरीवाल्यांच्या छूप्या जागेत ठेवलेले फेरीवाल्यांचे समान कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यास सांगितले.
आजवर ही जागा कोणालाही माहित नसताना फेरीवाल्यांवर कारवाई सुरु असतानाही सामान याच ठिकाणी लपवत असल्याचे उघडकीस आले. कुमावत यांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले.
स्टेशनबाहेरील 150 मीटरच्या आतील परिसरात फेरीवाले बसू नये असा नियम असताना फेरीवाले बसत होते. सहायक आयुक्त संजय कुमावत हे नेहमी प्रमाणे शुक्रवार 9 तारखेला अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास गेले असता रामनगर तिकीट घराजवळील एका अंधाऱ्या जागेत फेरीवाले समान लपवत असल्याचे दिसून आले.
कुमावत यांनी तातडीने कर्मचाऱ्यांना येथील लागेत लपविलेले समान बाहेर काढण्यास सांगितले. दुकानदारानी फुटपाथवर केलेले अतिक्रमण पाहून फुटपाथवरील समानही जप्त केले. फुटपाथ फेरीवाला मुक्त केल्यानंतर पथकाने मधुबन गल्ली, उर्सेकर वाडी, रामनगर तिकीट घराजवळील फेरीवाल्यांवर कारवाई केली.