डोंबिवलीतील (Dombivli News) आरएसएस शाखेवर दगडफेकीच्या घटनेनंतर आरएसएस कार्यकर्ते खूपच आक्रमक झाले आहेत. डोंबिवलीतील अप्पा दातार चौकात आरएसएस कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर ही बैठक झाली आहे. यावेळी कार्यकर्ते आक्रमक होताना दिसून आले. येथे लहान मुलांना शिकवले जात असताना दगडफेक झाली. या घटनेनंतर काल अप्पा दातार चौकात बैठक झाली. या बैठकीत सर्व आर्थिक व्यवहार फक्त हिंदू व्यापाऱ्यांशीच करावेत अशा सूचना देण्यात आल्या. अल्पसंख्याकांवर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. यामुळे डोंबिवलीत तणावाचे वातावरण दिसून येत आहे आणि पोलिस प्रशासन सतर्क आहे.
काय आहे सदर घटना ?
डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखेवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक (KDMC) केल्याची घटना घडली. ही घटना मागच्या आठवड्यात रविवार रात्री ८ वाजता घडली, जेव्हा मुलांना प्रशिक्षण दिले जात होते. सुदैवाने, या दगडफेकीत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या घटना नंतर स्थानिक टिळक नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या घटने नंन्तर सिसिटीव्ह च्या मदतीने पोलिसांनी तपास करून ५ जणांना ताब्यात घेतले आहे. या घटने मध्ये ताब्यात घेतलेल्या लोकांपैकी ४ जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. ही शाखा खुल्या मैदानात चालविली जाते. RSS शी संबंधित लोकांनी या दगडफेक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. डोंबिवली, जो ठाणे जिल्ह्यात RSS चा बालेकिल्ला मानला जातो, तिथे ही घटना घडली आहे.