Dombivli : राहुल सोलापुरकरच्या वक्तव्यावर डोंबिवलीत शिवसैनिकांकडून निषेध; मानपाडा पोलिसांना निवेदन

माय मराठी
2 Min Read

Dombivli: ( शंकर जाधव ) अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत बेजबाबदार वक्तव्ये केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व हिंदू समाजाचे दैवत आहेत. महाराजांबद्दलची इतिहासकालिन माहिती तोडून-मोडून राहुल सोलापुरकर समोर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत ते आम्ही खपवून घेणार नाही. राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांच्या बाबतीत अपमानास्पद व चुकीचे वक्तव्य केल्यामुळे
त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली.

कावेरी चौक येथे शिवसैनिकांसह डोंबिवलीकर आणि शिवप्रेमी डोंबिवली एकत्रित येवून मानपाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ आमदार राजेश मोरे, कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, विधानसभा संघटक तथा सचिव बंडू पाटील, विभागप्रमुख तेजस पाटील, विकास देसले, गजानन व्यापारी यांच्यासह शिवसैनिक, शिवप्रेमी संघटना आणि समस्त डोंबिवलीकर उपस्थित होते. पोलीस प्रशासनास दिलेल्या लेखी स्वरूपातील तक्रार पत्रात म्हटले आहे की, राहुल सोलापुरकर या माथेफिरूवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी अन्यथा या मागणीसाठी शिवसैनिक, शिवप्रेमी संघटना आणि समस्त डोंबिवलीकर तीव्र आंदोलन करतील.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी जाणिवपूर्वक जाहिरपणे सोशल मीडियावर अपमानास्पद व चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आमच्या शिवप्रेमी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.राहूल सोलापूरकरचे कृत्य व वागणे हे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था निर्माण करणारे आहे. राहूल सोलापूरकरच्या वक्तव्याने महाराष्ट्रात शिवभक्तांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. सोलापुरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करा अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more