Dombivli : पलावा ब्रिज त्वरीत सुरू करा ठाकरे शिवसेनाआणि मनसेचे एकत्रित आंदोलन

माय मराठी
1 Min Read

डोंबिवली (Dombivli) (शंकर जाधव):


डोंबिवली (Dombivli)-पलावा पूल तातडीने सुरू करावा, या मागणीसाठी शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन प्रमुख पक्षांनी एकत्र येत जोरदार आंदोलन छेडले.

सात वर्षांपासून रखडलेल्या या पुलाच्या कामासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर असूनही, सरकारने अद्यापही काम पूर्ण केलेले नाही. फक्त तारीखांमध्ये बदल करत, लोकांना आश्वासनाचे गाजर दाखवून वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप करत, दोन्ही पक्षांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

या ऐतिहासिक एकत्रित आंदोलनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक कार्यकर्त्यांनी, भविष्यातही हे दोन पक्ष एकत्र येऊन काम करावे, अशी इच्छा बोलून दाखवली.

आंदोलनादरम्यान नेत्यांनी सरकारवर घणाघात करत इशारा दिला की, जर लवकरात लवकर ब्रिज सुरू न केला, तर पुढील टप्प्यात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल.

डोंबिवली आणि पलावा परिसरातील नागरिकांच्या सुरक्षितता आणि दळणवळणाच्या सोयीसाठी हा पूल तातडीने सुरू होणे गरजेचे असल्याचे दोन्ही पक्षांनी स्पष्ट केले.

शिवसेना ( ठाकरे):
दीपेश म्हात्रे (जिल्हाप्रमुख), रोहिदास मंडे, सदाशिव गायकर, विजय भोईर, भगवान पाटील, मुकेश भोईर, कोमल पाटील, प्रभाकर जाधव, अरुण जांभळे व इतर पदाधिकारी.

मनसे:
राजू पाटील (माजी आमदार), तात्या माने, वैशाली ताई राणे-दरेकर, दिपिका पेडणेकर, प्रकाश भोईर, हर्षद पाटील, राहुल कामत, सुदेश चुडनाइक, योगेश पाटील, तकदीर काळण आदी.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more