सहायक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कारवाईत फेरीवाल्यांना सुनावलं
डोंबिवली (Dombivli) ( शंकर जाधव )
डोंबिवली (Dombivli) पूर्वेकडील ‘फ’ प्रभाग क्षेत्र हद्दीतील स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांवर नेहमीप्रमाणे कारवाई सुरु होती. फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई सुरु असते. शुक्रवार 9 तारखेला सायंकाळी सहायक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी पथकासह कारवाई करताना ‘स्टेशनबाहेरील रस्तावर तुमचा सातबारा नाही… कारवाई तर होणारच ‘अशा शब्दात सुनावले.
कैलास लस्सी ते स्टेशनबाहेरील परिसरात कारवाई सुरु असतानाही दुकानबाहेर फेरीवाले बसलेले पाहून दुकानदारांनी फेरीवाल्यांना बसू देऊ नये असे आवाहन केले.
स्टेशनबाहेरील परिसर फेरीवाला मुक्त करण्याकरता पालिका प्रशासनाकडून सातत्याने कारवाई सुरु आहे. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील परिसरातील फेरीवाल्यांवर ‘फ’ प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त हेमा मुंबर कर यांनी फेरीवाला अतिक्रमण विभागाचे पथकप्रमुख व कर्मचारी यांनी फेरीवाल्यांवर कारवाई केली.’
स्टेशनबाहेरील रस्तावर तुमचा सातबारा नाही… कारवाई तर होणारच’ असे फेरीवाल्यांना सुनावले. अगदी अर्धा रस्तावर अतिक्रमण केल्यासारखे फेरीवाल्यांनी जागेवर भाजी,फळे, खेळणी, वस्तू ठेवल्या होत्या. काही दुकानासमोर फेरीवाले बसत आल्याने नागरिकांना त्रास होत होता. दुकानदारांनी फेरीवाल्यांना दुकानासमोर बसू देऊ नये असे मुंबरकर यांनी सांगितले.
सहायक आयुक्त मुंबरकर यांची फेरीवाल्यांवर कारवाई सुरु असताना वाहतुकीस अडचण निर्माण होई अशा प्रकारे रस्त्यावर दुचाकी पार्क पाहून त्या दुचाकींचे फोटो कर्मचाऱ्यांनी काढले. वाहतूक पोलिसांना या दुचाकीचे फोटो पाठवून कारवाई असे मुंबरकर यांनी यावेळी सांगितले.