आजच्या आधुनिक युगात विमान प्रवास (Flying) हा केवळ श्रीमंतांसाठी राहिलेला नाही, तर सर्वसामान्य प्रवाशांसाठीही तो सहजसाध्य झाला आहे. पूर्वीच्या तुलनेत विमान सेवा अधिक वेगवान आणि आरामदायक झाली असली, तरी विमानाच्या तिकिटांचे वाढते दर अनेक प्रवाशांसाठी मोठी समस्या ठरत आहेत. विशेषतः सणासुदीच्या काळात किंवा तातडीच्या प्रवासासाठी तिकीट बुक करताना मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे, विमान प्रवासाचा आनंद घेतानाच तिकीटाच्या खर्चावरही नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरते.
जर तुम्ही नियोजनपूर्वक बुकिंग केले, योग्य सर्च टूल्सचा वापर केला आणि काही स्मार्ट ट्रिक्स लक्षात ठेवल्या, तर तुम्ही सहजपणे तुमच्या विमान प्रवासाचा खर्च कमी करू शकता. अनेक वेळा प्रवासी तिकिटांवरील लपलेल्या सवलतींकडे दुर्लक्ष करतात किंवा योग्य वेळी बुकिंग करत नाहीत, त्यामुळे अनावश्यक जास्त पैसे खर्च होतात. जर तुम्हालाही विमान प्रवास कमी खर्चात करायचा असेल, तर खाली दिलेल्या काही प्रभावी उपायांचा अवलंब करा आणि तिकीट खर्चात बचत करा.
तिकीट आधीच बुक करा
विमानाचे तिकीट स्वस्त मिळवायचे असेल, तर ते कमीत कमी ३०-४५ दिवस आधी बुक करा. तिकीट शेवटच्या क्षणी काढल्यास त्याची किंमत जास्त असते. तसेच, तिकीट बुक करताना फ्लेक्सिबल डेट्स (Flexible Dates) पर्याय वापरा, त्यामुळे तुम्हाला स्वस्त तिकिटे मिळण्याची संधी अधिक राहते.
ऑफ-सीझनमध्ये प्रवास करा
सण, उन्हाळी व दिवाळी सुट्ट्यांमध्ये विमान भाडे खूप वाढते. शक्य असल्यास ऑफ-सीझनमध्ये (सण-उत्सव नसताना) प्रवास करा. विशेषतः मंगळवार आणि बुधवारी तिकीट दर तुलनेने कमी असतात.
वेगवेगळ्या वेबसाइट आणि अॅप्सचा वापर करा
काही वेळा एका वेबसाइटवर महाग तिकीट दिसते, तर दुसऱ्या वेबसाइटवर स्वस्त मिळू शकते. स्कायस्कॅनर, मेकमायट्रीप, गोआयबीबो, ट्रिपअॅडव्हायझर यांसारख्या प्लॅटफॉर्मवर तुलना करून स्वस्त तिकीट बुक करा. काही अॅप्सवर विशेष कूपन आणि सवलती देखील मिळतात.
सीक्रेट मोड किंवा इनकॉग्निटो मोड वापरा
बर्याचदा तुम्ही सतत तिकीट शोधत असाल, तर वेबसाइट तुमच्या सर्च हिस्ट्रीमुळे तिकिटांची किंमत वाढवते. यासाठी नेहमी ब्राउझरचा इनकॉग्निटो मोड वापरा.
You Might Also Like
लो-कॉस्ट एअरलाईन्स निवडा
इंडिगो, स्पाईसजेट, गोफर्स्ट यांसारख्या लो-कॉस्ट एअरलाईन्स मोठ्या एअरलाईन्सच्या तुलनेत स्वस्त असतात. त्यांचे वेब चेक-इन आणि हात सामान (Cabin Baggage) नियम पाळल्यास अधिक पैसे वाचू शकतात.
मायलेज किंवा क्रेडिट कार्ड पॉईंट्स वापरा
तुमच्याकडे एअरलाईन्सच्या लॉयल्टी प्रोग्रॅमचे पॉईंट्स किंवा क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स असतील, तर त्याचा वापर करून तिकीट स्वस्तात मिळवता येते. काही बँका आणि ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड्सवर हवाई प्रवासासाठी विशेष सूट असते.
मध्यरात्री किंवा सकाळी लवकरचे फ्लाइट बुक करा
बर्याचदा मध्यरात्री किंवा पहाटेच्या फ्लाइट्स स्वस्त असतात. त्यामुळे वेळेनुसार लवकर फ्लाइट घेणे फायद्याचे ठरते. याशिवाय, थेट फ्लाइटऐवजी स्टॉपओव्हर फ्लाइट्स घेणे कधी कधी अधिक स्वस्त पडते.
बजेट एअरपोर्ट वापरण्याचा विचार करा
काही वेळा मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांऐवजी जवळच्या लहान विमानतळांवर उतरणे स्वस्त पडू शकते. त्यामुळे तुमच्या गंतव्यस्थळी जवळपास कोणते स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत हे तपासा.
फ्लॅश सेल आणि प्रमोशनल ऑफर्सवर लक्ष ठेवा
एअरलाईन्स वेळोवेळी विशेष सवलती आणि फ्लॅश सेल जाहीर करतात. या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी एअरलाईन्सच्या अधिकृत वेबसाइट्स आणि सोशल मीडिया पेजेसवर लक्ष ठेवा.