G S Mahanagar bank : जी.एस. महानगर बँकेची निवडणूक एकतर्फी ? अर्ज मागे घ्यायच्या दिवशीच १ जागा बिनविरोध, विजयाने गुलाल उधळत सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलची सुरुवात

माय मराठी
2 Min Read

जी.एस. महानगर सहकारी बँक लिमिटेड, G S Mahanagar bank मुंबईच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह आणि चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत नणंद-भावजयीच्या पॅनलमध्ये एकतर्फी लढत होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. मात्र हि लढत एकतर्फी होणार असे चित्र एव्हाना दिसायला लागले आहेत. दिनांक १६ मे पर्यंत अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रिया असतानाच अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्ग मतदारसंघातून सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलचे संतोष रणदिवे हे बिनविरोध निवडून आले आहेत.

संचालक मंडळास वेळोवेळी डावलून अनेक निर्णय घेतल्याने…

जी.एस. महानगर बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी स्व. उदयराव शेळके यांच्या पत्नी गीतांजलीताई शेळके यांच्या नेतृत्वाखाली सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांची रीघ लागली होती. मुंबईतील फोर्ट येथील कार्यालयामध्ये शेवटच्या दिवसापर्यत भेटीगाठींचा सिलसिला चालू होता. तसे पाहायला गेल्यास ही लढाई नणंद विरुद्ध भावजय असली तरी सुमनताई शेळके आणि स्मिता पटेल यांनी गेल्या अडीच वर्षात संचालक मंडळास वेळोवेळी डावलून अनेक निर्णय घेतल्याने त्यांच्या कारभारावर एकंदरीतच चिंता व्यक्त केली जात होती. येत्या १ जूनला होणारी निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. मात्र आढ्मुठ्या भूमिकांमुळे जुन्या जाणत्या संचालकांनी गीतांजली ताई शेळके यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.

उमेदवारीची अपेक्षा न करता आम्ही गीतांजली ताईसोबतच राहणार

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलच्या प्रत्येक मेळाव्यास मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी होत होती. लोक भरभरून बोलत होते, छातीठोक आपला पाठिंबा दर्शवत होते त्यामुळे एकंदरीतच या गोटामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच लोक सोशल मीडियावर देखील सकारात्मक प्रतिसाद या पॅनल ला देत आहेत. यापैकी अनेकजण उमेदवारीची अपेक्षा न करता आम्ही गीतांजली ताईसोबतच राहणार असा नारा देताना दिसत आहेत.

एकंदरीतच काय तर संतोष रणदिवे यांच्या विजयाने गुलाल उधळत सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलची सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही. बाकी चित्र २ जून रोजी स्पष्ट होईलच.

 

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more