Ganesh Idol : मुंबईत फक्त पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्ती आणण्याची परवानगी ?

माय मराठी
3 Min Read

मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा आणि हवाहवासा वाटणारा सण म्हणजे गणेशोत्सव… काहीठिकाणी आतापासूनच बुकिंग आणि इतर तयारीनं सुरुवात झाली असेलच. मात्र गणेशोत्सव यायच्या आधी एक मुद्दा प्रामुख्याने समोर येतो तो म्हणजे पीओपी मूर्तीं… यावर्षी देखील गणेशोत्सव पर्यावरणपूरक (Ganesh Idol)  बनवण्यासाठी पालिकेने आधीच नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका यावर्षी पीओपी मूर्तींवर बंदी घालण्यात येईल यावर ठाम आहे. मुंबई महानगरपालिकेने पेण-पनवेलच्या मूर्तिकारांना पत्र पाठवून आवाहन केले आहे की, मुंबईत फक्त पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्ती आणण्याची परवानगी दिली जाईल.

शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी आवश्यक तेवढीच माती पालिका मोफत पुरवेल. त्यासाठी पालिकेने आधीच तयारी सुरू केली आहे. गुरुवारी या संदर्भात पालिका प्रशासनाने सर्व मूर्तिकार संघटनांसोबत बैठक आयोजित केल्याचे सांगण्यात आले.

गणेशोत्सवाला चार महिने शिल्लक असताना, मुंबई महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, केवळ पर्यावरणपूरक मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांनाच मंडप उभारण्याची परवानगी दिली जाईल. यावर्षीही मूर्तिकारांना मोफत शाडूची माती दिली जाईल. या परवानगीसाठी सूचक अट अशी आहे की मूर्ती इतक्या उंचीची असावी की उत्सवादरम्यान मूर्तीचे विसर्जन करणे आणि येणे सोपे होईल.

रायगड जिल्ह्यातून, पेण-पनवेल येथून मोठ्या प्रमाणात मूर्ती मुंबईत आणल्या जातात. त्यामुळे येथील मूर्तिकारांना पर्यावरणपूरक मूर्ती बनवायच्या आहेत. महिन्याभरापूर्वी पालिकेने मूर्तिकार संघटनेला पत्राद्वारे कळवले आहे की पीओपी मूर्तींना परवानगी दिली जाणार नाही. गुरुवारी सर्व मूर्तिकार संघटनांसोबत पालिका प्रशासनाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२० मध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींवर बंदी घातली होती. तथापि, विविध कारणांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबली. तथापि, उच्च न्यायालयाच्या फटकारानंतर, पालिका प्रशासनाने यावर्षीच्या माघी गणेशोत्सवापासून १०० टक्के पीओपी बंदीचा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला. माघी गणेश जयंती उत्सवादरम्यान पीओपी गणेश मूर्ती कुठेही विकू देऊ नयेत. जर असतील तर उच्च न्यायालयाने ३० जानेवारी रोजी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकांना आदेश दिले होते. भाद्रपदातील गणेशोत्सवादरम्यानही हा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी पालिकेने काम सुरू केले आहे.

गणेशोत्सवापूर्वी फेब्रुवारीमध्ये गणेशमूर्ती बनवण्याचे काम मूर्तिकारांनी सुरू केले आहे. मात्र, यावर्षी पीओपी मूर्ती आहे की शाडूची मूर्ती आहे याबद्दल अजूनही गोंधळ असल्याने, अनेक मूर्तिकारांनी काम सुरू केलेले नाही. एप्रिल महिना संपत आला असला तरी, अद्याप ही समस्या सुटलेली नाही. मंडपासाठी परवानगी घेताना, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती असेल तरच परवानगी दिली जाईल. या वर्षीही मूर्तिकारांना मोफत शाडू माती दिली जाईल. प्रत्येक झोनमध्ये १०० टन, म्हणजे एकूण सातशे टन माती किंवा मागणीनुसार आवश्यक तेवढी शाडू माती मोफत दिली जाईल. मागणी वाढल्यास अधिक माती खरेदी केली जाईल.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more