Gen-Z शिक्षण घेतलं की, प्रत्येकाला गडेलठ्ठ पगाराची नोकरी करण्याचं स्वप्न असतं. काहीचं हे स्वप्न पूर्ण होतं तर काहींना बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा लागतो. पण इथे प्रश्न मेहनतीचा नाही तर, 1997 ते 2012 (Gen-Z) या काळात जन्मलेल्या पोरांना न मिळणाऱ्या नोकरीचा आहे.
आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय? तर,जनरेशन झेड म्हणून 1997 ते 2012 (Gen-Z ) या काळात जन्माला आलेल्या पोरांची पिढी ओळखली जाते. याच पोरांना अनेक कंपन्या चांगलं शिक्षण घेऊनही नोकरी देण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे. याबाबत नुकताच एक सर्वेदेखील करण्यात आला यात अनेक कारणांचा पाढा वाचण्यात आला आहे. जनरेशन झेडला नोकरी न देण्यामागची कारणं नेमकी काय? यावर प्रकाश टाकणारी ही बातमी.
तर, शिक्षण आणि करिअर कंसलटंन्सी म्हणून काम करणाऱ्या कंपनीने 1,000 हायरिंग मॅनेजर्सवर एक सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणातून असे दिसून आले की, जनरेशन झेड तरुण अनेकदा अशा नोकऱ्या निवडतात ज्या त्यांच्यासाठी योग्य नसतात किंवा ते त्या जबाबदारीसाठी तयार नसल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर, या पिढीकडे योग्य संवाद कौशल्याचाही अभाव असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
GEN -Z च्या परफॉर्मन्सवर प्रश्नचिन्ह
Gen Z च्या कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, सर्वेक्षणात दर सहापैकी एक कंपनी जेन झेड पिढीतील तरुणांना नोकरी देण्यास कचरत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या कंपन्यांना या पिढीतील कर्मचाऱ्यांच्या कामगिरीतून समाधान मिळत नाहीये.
सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की, 50% पेक्षा जास्त हायरिंग मॅनेजर्सना Gen Z पिढीमध्ये कठोर परिश्रम करण्यासह संवाद कौशल्याचाही अभाव असल्याचे नमुद करण्यात आले आहे. एवढेच काय तर, या पिढीच्या त्यांच्या बॉसबद्दल अवास्तव अपेक्षा आहेत.
आता समोर आलेली ही बातमी जरी जनरेशन झेडमधील पिढीची धाकधूक वाढवणारी असली तरी, करण्यात आलेल्या सर्वेक्षणात नोकरी मिळवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे यावरही मार्गदर्शन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने या पिढीतील तरुणांनी नोकऱ्या मिळवण्यासाठी कंपन्यांच्या गरजा समजून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे. याशिवाय वक्तशीर आणि राजकारणाबरोबरच सोशल मीडियापासून लांब असणाऱ्या मुलांना नोकरी देण्याकडे कंपन्यांचा कल आहे. त्यामुळे जेन झेड जनरेशनने या गोष्टी टाळण्याचा सल्लाही यात देण्यात आला आहे.