Heat Wave: महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांतील 96 जिल्ह्यांत येणार उष्णतेच्या लाटा

माय मराठी
2 Min Read

देशभरात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. उष्णतेत (Heat Wave) मोठी वाढ दुपारच्या वेळी होत आहे. राज्यातही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. अशातच हवामान विभागाने देशातील 9 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

वादळ आणि पाऊस 14 राज्यांमध्ये होईल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्लीसह 9 राज्यांतील तब्बल 96 जिल्ह्यांत देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात जळगाव आणि भुसावळ या जिल्ह्यांत तापमान 45 अंशापर्यंत जाईल. मागील दोन दिवसांत जळगावच्या तापमानात मोठी वाढ होत आहे. येथे तापमान पाच ते सहा अंशांनी वाढलेलं आहे.

आताच्या परिस्थितीत जळगावातील तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचले आहे. अगदी सकाळच्या वेळी सुद्धा प्रचंड उष्णता जाणवत आहे. विदर्भातील अकोला, नागपूर, हिंगोली या जिल्ह्यांतील तापमानात (Heat Wave) मोठी वाढ झाली आहे.


महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांतही सूर्य आग ओकत आहे.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर, मुरैना, भिंडसह 11 जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत तापमान 44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानातील काही जिल्ह्यांत तापमान 45 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ईशान्य भारतात मात्र तापमानात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळमधील तिरुवनंतपूरम, कन्नूर, कोझिकोड, एर्नाकूलम या जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील तापमानात मोठी वाढ होत आहे. या राज्यांतील काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या या राज्यांत अनेक ठिकाणी तापमान 45 अंशांच्याही पुढे गेले आहे. 50 अंश तापमान प्राण्यांसाठी अतिशय हानीकारक मानले जाते. परंतु, मागील काही महिन्यांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गुजरातमधील कांडला येथे पारा 45.6 अंशावर पोहोचला. राजस्थानातील जैसलमेर आणि बाडमेरमध्ये 45 अंशाच्या पुढे तापमान गेले आहे. राजधानी दिल्लीत तापमान 42 अंशावर नोंदवले गेले. जे सामान्यापेक्षा चार अंशांन जास्त आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more