Heating: उन्हाळ्यात लॅपटॉप-कंप्यूटरला ठेवा अशा प्रकारे थंड

माय मराठी
2 Min Read

तापमानाने उच्चांक गाठले असताना केवळ माणसांनाच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सलाही (Heating) उष्णतेचा फटका बसतो. लॅपटॉप, मोबाईल, कंप्यूटर यांसारखी उपकरणं उन्हाळ्यात सहज गरम होतात आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते. म्हणूनच, ही उपकरणं थंड ठेवण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी टिप्स जाणून घेणं गरजेचं आहे.

हवेशीर जागा निवडा, उपकरणांना मोकळी जागा द्या

लॅपटॉप, कंप्यूटर, राउटर, प्रिंटर यांसारख्या उपकरणांना गरम होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांना हवेशीर आणि उघड्या जागेत ठेवा. कोणत्याही डिव्हाईसला भिंतीजवळ अथवा बंद कपाटात ठेवू नका. अनेक उपकरणांमध्ये उष्णता बाहेर टाकण्यासाठी व्हेंट्स (vents) असतात. हे व्हेंट्स स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. धूळ साचल्यास ही हवा बाहेर जाण्यात अडथळा होतो आणि उपकरण अधिक गरम होतो.

सूर्यप्रकाशापासून सावध राहा

काहीजण खिडकीजवळ बसून काम करतात, पण थेट सूर्यप्रकाशामुळे लॅपटॉप किंवा कंप्यूटर अधिक गरम (Heating) होऊ शकतो. त्यामुळे हे उपकरण थेट उन्हाच्या संपर्कात येणार नाहीत याची खबरदारी घ्या. शक्य असल्यास ते पंख्याखाली ठेवा किंवा थंड वातावरणात ठेवा. उष्णता थेट डिव्हाईसवर पडत असेल तर त्याचे नुकसान होऊ शकते.

डिव्हाईस एकमेकांवर ठेवू नका

एकापेक्षा अधिक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस वापरत असल्यास त्यांना एकमेकांवर ठेवण्याची चूक करू नका. गरम (Heating) उपकरणावर दुसरं डिव्हाईस ठेवल्यास दोन्हींची उष्णता वाढते आणि त्यांचा परफॉर्मन्स कमी होतो. अशावेळी कूलिंग पॅड्स वापरणं हा चांगला पर्याय ठरू शकतो. विशेषतः लॅपटॉपसाठी हे खूप उपयुक्त ठरतात.

अतिशय गरम झाल्यास डिव्हाईस बंद करा

जर सर्व उपाय करूनही तुमचं डिव्हाईस खूप गरम होत असेल, तर ते काही वेळ बंद ठेवा. थोडा ब्रेक घेऊन डिव्हाईस थंड झाल्यावरच पुन्हा वापर सुरू करा. सतत गरम स्थितीत वापरल्यास डिव्हाईसचं हार्डवेअर किंवा बॅटरी डॅमेज होण्याची शक्यता वाढते. उन्हाळ्यात केवळ शरीराचीच काळजी घेणं पुरेसं नाही, तर तुमच्या डिजिटल साथीदारांचीही काळजी घ्या. योग्य ठिकाणी ठेवणं, नियमित स्वच्छता, थेट ऊन टाळणं आणि गरजेनुसार डिव्हाईस बंद ठेवणं – या काही साध्या सवयी तुमचं डिव्हाईस दीर्घकाळ चालू ठेवू शकतात.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more