आपण पाहतो बऱ्याच Ladies आणि मुली मासिक पाळीमध्ये खूप कमीवेळा सॅनेटरी नॅपकिन बदलतात आणि याचं कारण असं असतं कि आम्हाला ब्लड फ्लो खूप कमी प्रमाणात होतो म्हणून आम्ही वारंवार पॅड बदलत नाही. पण असे करणे तुमचे निरोगी जीवनात अडथळा आणू शकतो. सॅनेटरी नॅपकिन हे ब्लड फ्लोव वर बदलणे टाळा. ब्लड फ्लोव कमी असो वा जास्त पॅड नियमित पणे बदलणे गरजेचे असते. पॅड वेळेवर बदलण्याची सवय तुम्हाला इतर आजारांपासून लांब ठेऊ शकते. मासिक पाळी मध्ये प्रायव्हेट पार्ट स्वच्छ आणि कोरडा ठेवणे आणि हायजिन संतुलित ठेवणे आवश्यक असते त्यामुळे शक्य असल्यास प्रत्येक ४ तासांनी पॅड बदलणे बंधनकारक आहे. आणि शक्य नसल्यास तो पॅड ६ तासांपेक्षा जास्त वेळ वापरू नये.
चांगला पॅड निवडा : सॅनेटरी नॅपकिन वापरताना, तुमच्या पॅडचा प्रकार योग्य असणे गरजेचे आहे. नॅचरल मटेरियल्सपासून बनवलेले पॅड वापरणे चांगले, कारण ते तुमच्या त्वचेसाठी योग्य असतात.
वापरानंतर पॅड ची नीट विल्हेवाट करा : पॅड वापरून झाल्यावर त्याला योग्य प्रकारे टाकून द्या एका न्युजपेपर बांधून त्याला वेस्टबिनमध्ये टाका आणि पॅड कधीही टॉयलेटमध्ये फ्लश करू नका.
पॅड वापरताना कंफर्टचा विचार करा : तुम्ही आरामदायक असणं महत्त्वाचं आहे. पॅडची जाड, मऊ आणि चांगल्या पद्धतीची निवड करा, जेणेकरून तुम्हाला तणाव येणार नाही. किंव्हा जीन्स घातल्यानंतर हि तुम्हाला त्रास जाणवणार नाही.
अल्टर्नेटिव्ह वापराचे विचार करा : सॅनेटरी नॅपकिन ऐवजी रियुजेबल सॅनेटरी पॅड किंवा मेन्सट्रूअल कप्सचा वापर करण्याचा विचार करा. हे पर्यावरणासाठीही चांगले असतात आणि आरोग्यदृष्ट्या हि सुरक्षित असतात.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये जास्त पाणी प्या जास्त हायड्रेशन ठेवण्यासाठी रोज पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे. यामुळे तुमचे शरीर स्वच्छ राहील आणि शारीरिक अस्वस्थता कमी होईल.आणि तुमच्या आहारावर लक्ष द्या मासिक पाळी दरम्यान संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. जास्त मसालेदार किंवा जड पदार्थ टाळा. पाणी, फळं आणि भाज्या खाल्ल्यामुळे तुमचं ब्लड फ्लो नीट राहील.तसेच तुम्ही मऊ व सुती कपडे घाला मासिक पाळी दरम्यान आरामदायक आणि स्वच्छ अंतर्वस्त्र घालणे आवश्यक आहे. सिंथेटिक कपड्यांच्या ऐवजी सूती कपड्यांचा वापर करा. ह्या सर्व गोष्टी तुमच्या आमच्यातल्या महिलांसाठी, मुलींसाठी उपयुक्त ठरतील. आणि ते अनेक आजारांपासून लांब राहतील याची आपण हि दक्षता बाळगू.