होळी (Holi) म्हणजे रंगांचा सण मात्र, खेळताना वापरलेले रंग त्वचेवर, केसांमध्ये आणि कपड्यांवर घट्ट बसतात आणि निघायला खूप वेळ लागतो. केमिकलयुक्त रंग त्वचेला हानी पोहोचवू शकतात, त्यामुळे त्यांना योग्य पद्धतीने काढणे महत्त्वाचे आहे. बाजारातील हार्श साबण किंवा स्क्रब वापरल्याने त्वचा कोरडी आणि रफ होऊ शकते. त्यामुळे नैसर्गिक आणि घरगुती उपायच अधिक फायदेशीर ठरतात.
होळी खेळण्यापूर्वी त्वचेला तेल किंवा मॉइश्चरायझर लावल्यास रंग त्वचेत मुरत नाही, त्यामुळे काढणे सोपे होते. जर रंग आधीच लागू लागला असेल, तर काही घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात. बेसन आणि दही एकत्र करून बनवलेली पेस्ट रंग लागलेल्या भागावर लावून हलक्या हाताने मसाज केल्यास रंग सहज निघतो. तसेच, बदाम वाटून त्यामध्ये दूध मिसळून तयार केलेली पेस्टही प्रभावी ठरते. गुलाबपाणी आणि लिंबाच्या रसाचा वापर केल्याने त्वचेला फ्रेश वाटते आणि रंग लवकर निघतो. याशिवाय, ओलिव्ह ऑइल किंवा नारळ तेल लावून काही वेळ मसाज केल्यास रंग मऊ होतो आणि साबणाने सहज निघतो.
होळीचा प्रत्येक रंग काय सांगतो ?
केसांमधून रंग काढण्यासाठीही काही सोपे उपाय आहेत. होळी खेळण्याआधी केसांना तिळाचे किंवा खोबरेल तेल लावल्यास रंग मुरत नाही. रंग बसला असल्यास गरम खोबरेल तेलाने मसाज करून नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवावेत. दही आणि लिंबू मिसळून लावल्यानेही रंग पटकन निघतो. बिअर रिंस केल्याने रंग मऊ होतो आणि सहज धुतला जातो. तसेच, मेथी दाणे भिजवून दह्यात मिसळून केसांना लावल्यास रंग जाईल आणि केस चमकदार राहतील.
काही रंग कपड्यांवर पक्के बसतात, पण काही घरगुती उपाय वापरल्यास ते सहज निघू शकतात. कपडे कोमट पाण्यात व्हिनेगर आणि बेकिंग सोडासोबत भिजवल्यास रंग कमी होतो. पांढऱ्या कपड्यांसाठी हायड्रोजन पेरॉक्साईड वापरू शकता, पण आधी एका छोट्या भागावर टेस्ट करून बघा. कपडे लवकर धुतल्यास रंग खोलवर मुरत नाही, त्यामुळे होळी खेळल्यानंतर शक्य तितक्या लवकर कपडे धुणे चांगले.
मुंबईत होळी-धुलीवंदनाला डीजे आणि लाऊडस्पीकर बंदी; आदित्य ठाकरे काय म्हणाले
नखे आणि नखांच्या भोवती रंग लागत असेल, तर लिंबाचा रस लावून ठेवल्यास रंग सहज निघतो. पांढऱ्या टूथपेस्टने नखे चोळल्यासही रंग निघतो. तसेच, व्हिनेगर आणि पाण्यात बोटं काही वेळ भिजवून ठेवल्यास नखांवरील रंग कमी होतो.
रंग त्वचेत किंवा केसांमध्ये जास्त वेळ टिकू नये यासाठी काही गोष्टी आधीच करून ठेवाव्यात. होळी खेळण्याआधी खोबरेल किंवा ऑलिव्ह तेल त्वचेवर आणि केसांवर लावा. गडद रंगाचे किंवा जुन्या कपड्यांचेच वापर करा, जे खराब झाले तरी चालतील. डोळ्यांमध्ये रंग जाऊ नये म्हणून गॉगल्स किंवा मोठे सनग्लासेस घाला. ओठ कोरडे पडू नयेत म्हणून लिप बाम लावा. होळी खेळण्याआधी नखे लहान ठेवा आणि त्यांना वॉटरप्रूफ नेलपेंट लावा, यामुळे रंग लगेच निघेल.
स्वादिष्ट पेय आणि आरोग्याचा खजिना
होळीचा आनंद घेताना त्वचा, केस आणि कपड्यांची योग्य काळजी घेतल्यास नंतर रंग काढण्याचा त्रास कमी होतो. घरगुती आणि नैसर्गिक उपायांचा वापर केल्याने कोणतेही नुकसान न होता त्वचा आणि केस निरोगी राहतात. वरील उपाय वापरून बघा आणि होळीचा सण अजून आनंदाने साजरा करा.