Home Loan : होमलोन घेत आहात? तर या काही गोष्टींची पूर्व तयारी नक्की करा…

माय मराठी
4 Min Read

Home Loan घेण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. होम लोन तुमच्या भविष्यातील मोठ्या आर्थिक निर्णयांपैकी एक आहे, त्यामुळे तुम्ही निर्णय घेण्याआधी योग्य तयारी केली पाहिजे. खाली दिलेल्या गोष्टी ज्या तुम्हाला होमलोन घेण्यापूर्वी लक्षात घेणं आवश्यक आहे.

व्याज दर :
लोन घेताना बँक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला व्याज दर देतात. तर हा व्याज दर दोन प्रकारचा असू शकतात. एक म्हणजे फिक्स्ड (स्थिर)दर किंवा फ्लोटिंग (चल) दर असू शकतात. फिक्स्ड दर म्हणजे हा दर कर्जाच्या कालावधी पर्यंत स्थिर राहतो. फ्लोटिंग दर आणि हा दर वेळोवेळी बदलतो, म्हणजे कधी कमी, कधी जास्त होऊ शकतो. तुमच्या बजेटला अनुरूप असलेला व्याज दर तुम्ही निवडा. फ्लोटिंग दर कमी असू शकतो, पण तो बदलत राहील, तर फिक्स्ड दर स्थिर राहतो.

तुमचा आर्थिक प्लॅन:
कर्ज घेताना, भविष्यातील आर्थिक खर्च लक्षात ठेवा. ह्याचा उद्देश असा की तुमच्या आर्थिक स्थितीला याच्या वाईट परिणामांपासून वाचवता येईल. घर खरेदीच्या बाबतीत, तुमच्या दीर्घकालीन कर्जाची परतफेड तुमच्या आर्थिक स्थितीला अवघड होईल अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या.

कर्जाची परतफेडीची वेळ :
तुम्ही कर्ज किती कालावधी साठी घेत आहात यासाठी संपूर्णपणे सुनियोजन करणे आवश्यक आहे. यामध्ये दोन प्रकार आहे एक म्हणजे लहान कालावधी आणि दुसरं म्हणजे दीर्घकालीन कालावधी. जर तुम्ही लहान कालावधी ठेवत असाल तर तुम्ही दीर्घकाळापर्यंत कर्जाच्या हिशोबात अडकाल आणि जर तुम्ही दीर्घकालीन कालावधी घेतला तर तुम्ही लवकरात लवकर कर्ज मुक्त होऊ शकता.

विमा :
होम लोन घेताना, तुम्हाला काही बँका घर कर्जावर प्रोपर्टी इन्शुरन्स किंवा लाइफ इन्शुरन्स घेण्याची शिफारस करू शकतात. ह्याचा उद्देश घर किंवा तुमचं जीवन सुरक्षित ठेवणं आहे. त्यामुळे काही भेडणारी परिस्थिती घडल्यास कर्जाची परतफेड चालू राहू शकेल.

EMI कसा ठेवायचा?:
EMI म्हणजे तुम्हाला दर महिना जो हप्ता भरावा लागतो. तुम्ही तुमच्या महिन्याचे उत्पन्न आणि खर्चांचा योग्य विचार करा. EMI तुमच्या उत्पन्नाच्या ४०% पेक्षा जास्त न ठेवण्याचा सल्ला बऱ्याचदा दिला जातो.मासिक हप्त्याचा ओझा सहन करण्यासारखा असावा याची काळजी घ्या.

बॅंक किंवा संस्थेची विश्वासार्हता :
तुम्ही ज्या कोणत्या बँक मधून किंवा संस्थेकडून कर्ज काढत आहात त्याची विश्वासहर्ता तपासणे गरजेचे आहे. त्या संस्थेचा आणि बँकेचा इतिहास आणि ग्राहक सेवा लक्षात घेतल्यास तुमाला चांगला निर्णय घेण्यास तुम्हाला मदत होईल.

क्रेडिट स्कोर:
तुमचा क्रेडिट स्कोर (CIBIL स्कोर) हा बँक कर्ज मंजूर करताना महत्त्वाचा घटक आहे. क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी तुमचे आधीचे कर्ज वेळेवर फेडणं, क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेत करणे आणि कर्ज उशीर न करणे हे महत्त्वाचे आहे.

कर्जाच्या अतिरिक्त शुल्कांची माहिती :
होम लोन घेताना कधीकधी काही अतिरिक्त शुल्क लागतात. जसे कि,
प्रोसेसिंग फी: कर्ज मंजूरी प्रक्रियेसाठी बँक घेत असलेला शुल्क.
पेनल फी: जर तुम्ही महिन्याचा हप्ता वेळेवर न भरला तर बँक अतिरिक्त शुल्क आकारू शकते.
सर्विस चार्जेस: काही बँका कर्जाच्या संपादनासाठी विविध सर्विस शुल्क घेतात.
या सर्व शुल्कांची माहिती तुम्हाला कर्ज घेणाऱ्याच्या आधी समजून घ्या.

लोन मंजुरी प्रक्रिया :
होम लोन मंजुरीसाठी बँक तुम्हाला काही कागदपत्रं विचारेल, तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र, ओळख प्रमाणपत्र, घराच्या किमतीची माहिती इत्यादी.
तुमचे सर्व कागदपत्र योग्य आणि पूर्ण असावेत याची नोंद घ्यावी. तसेच बँकेला किंवा संस्थेला तुमची कर्ज परत फेडण्याची ताकद तपासावी लागेल. त्यासाठी तुम्ही त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more