भारताला ‘या’ 5 मुस्लिम देशातून मिळतो भरपूर पैसा, RBI ने आकडाच समोर आणला

माय मराठी
2 Min Read

गेल्या काही वर्षांपासून डॉलर रुपयाच्या तुलनेत वाढत असल्याने भारताची अर्थव्यवस्था कधी मजबूत तर कधी कमजोर होताना दिसत आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत दरवर्षी विदेशातून मोठ्या प्रणाणात पैसा येत असतो. या पैशांवरुन किती भारतीय नागरिक भारताच्या बाहेरुन देशात पैसे पाठवतात याबाबत आरबीआयला (RBI) माहिती मिळत असते. तर आता कोणत्या देशातून किती पैसे भारताच्या अर्थव्यवस्थेत जमा झाले आहे. या बाबत माहिती देणारा एक बुलेटिन 2025 आरबीआयने (RBI Bulletin 2025) जारी केला आहे. 2023-24 मध्ये अमेरिका (America) आणि ब्रिटनसारख्या (Britain) विकसित अर्थव्यवस्थांमधून देखील भारतीय अर्थव्यवस्थेत पैसा आला असल्याची माहिती या बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे.

कोणत्या आखाती देशांकडून पैसे येत आहेत?

बुलेटिनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2023-24 मध्ये भारतात पाठवण्यात आलेल्या एकूण रेमिटन्समध्ये गल्फ कोऑपरेशन कौन्सिल, ज्यामध्ये संयुक्त अरब अमिरात (United Arab Emirates) , सौदी अरेबिया (Saudi Arabia) , कतार (Qatar) , ओमान (Oman) आणि बहरीन (Bahrain) यांचा समावेश आहे. त्यांचा वाटा सुमारे 38 टक्के आहे. म्हणजेच 2023-24 मध्ये भारतच्या अर्थव्यवस्थेत 118.7 अब्ज डॉलर्स या आखाती देशांमधून आले आहे. माहितीनुसार, आखाती देशांमध्ये राहणारे भारतीय नागरिक जगभरातील विविध देशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या जवळपास निम्मे आहे.

तर दुसरीकडे भारतीय आखाती देशांव्यतिरिक्त गेल्या काही वर्षांत विकसित अर्थव्यवस्था देखील भारतात पैसे पाठवण्याचे प्रमुख स्रोत म्हणून उदयास आल्या आहेत. या बुलेटिननुसार, 2048 पर्यंत भारतातील काम करणाऱ्या लोकसंख्येत वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे भारत जगातील सर्वात मोठा कामगार पुरवठादार बनेल.

भारतातील एकूण रेमिटन्समध्ये अमेरिकेचा वाटा सर्वात मोठा आहे, जो 2020-21 मध्ये 23.4 टक्क्यांवरून 2023-24 मध्ये 27.7 टक्क्यांपर्यंत वाढला. तर ब्रिटनमधून येणारा पैसा देखील 2020-21 मध्ये 6.8 टक्क्यांवरून 2023-24 मध्ये 10.8 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. संयुक्त अरब अमिरात दुसऱ्या स्थानावर आहे. या देशाचा वाटा 2023-24 मध्ये 18 टक्क्यांवरून 19.2 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

भारतीय स्थलांतरितांची संख्या 1.85 कोटींवर पोहोचली

बुलेटिनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, परदेशात राहणाऱ्या भारतीय स्थलांतरितांची संख्या 1990 मध्ये 6.6 दशलक्ष होती ती 2024 मध्ये तिप्पट होऊन 18.5 दशलक्ष झाली आहे. त्यामुळे आता जागतिक स्थलांतरितांमध्ये भारतीयांचा वाटा 4.3 टक्क्यांवरून सहा टक्क्यांपर्यंत वाढला.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more