ज्या लोकांना दीर्घ काळ पैसे गुंतवणूक करण्याची इच्छा असते त्यांच्याकडून अनेक पर्याय शोधले (Investment Tips) जातात. अशा गुंतवणुकदारांसाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) आणि पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) हे दोन पर्याय उत्तम आहेत. या दोन्ही प्लॅनची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. पण या योजनांत तुम्ही दीर्घ काळ पैसे गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. पण तुमच्या आर्थिक गरजांनुसार कोणता प्लॅन उपयुक्त ठरेल याची माहिती घेऊ या.
तुमच्यासाठी कोणता गुंतवणूक प्लॅन उपयुक्त ठरेल याची माहिती एका उदाहरणातून समजून घेऊ या.. जर तुम्ही 1 लाख 35 हजार रुपये वार्षिक गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला किती परतावा मिळू शकतो.
FD ला पर्याय असलेल्या 5 सरकारी योजना, करमुक्त कमाई आणि 8% पेक्षा जास्त व्याज
एसआयपी म्हणजे काय?
म्युच्युअल फंडात (Mutual Fund) एसआयपी हा एक पैसे गुंतवणूकीचा पर्याय आहे. एसआयपी शेअर मार्केटशी (Share Market) संबंधित आहे. यामध्ये कुणीही किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करू शकतो. एसआयपी गुंतवणुकीवर किमान 12 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. तुम्ही तुमची पैसे गुंतवणूक करण्याची क्षमता आणि मासिक उत्पन्नाच्या हिशोबाने एसआयपीमध्ये गुंतवणूक करू शकता.
पीपीएफ म्हणजे काय?
You Might Also Like
पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रोविडेंट फंड ही (Public Provident Fund) एक सरकारी योजना आहे. या योजनेत तुम्ही एक वर्षात दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत मिळणारे व्याज 7.1 टक्के असू शकते. या योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्षे इतका आहे.
तुम्ही 15 वर्षांसाठी एसआयपी आणि पीपीएफ दोन्ही योजनांत वार्षिक 1 लाख 35 हजार रुपये गुंतवणूक करत असाल तर मुदत पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला किती रक्कम मिळू शकते याचा विचार केला आहे का? हे गणित सोप्या शब्दांत समजून घेऊ.
मोबाइल बिलमुळेही क्रेडिट स्कोअर होऊ शकतो खराब; गणित समजून घ्याच
एसआयपी गुंतवणुक कॅल्क्युलेशन
जर तुम्ही एसआयपीमध्ये वार्षिक 1 लाख 35 हजार रुपये गुंतवणूक करत असाल. म्हणजेच दर महिन्याला 11 हजार 250 रूपये गुंतवणूक तुम्ही करता. 15 वर्षांत तुम्ही एकूण 20 लाख 25 हजार रुपये गुंतवणूक करता. यामध्ये 12 टक्के दराने वार्षिक परतावा मिळतो. तसेच 15 वर्षे पूर्ण होताच एकुण जमा रक्कम 56 लाख 76 हजार 480 रुपये होईल जी तुम्हाला मिळेल. या रकमेत एकूण नफा 36 लाख 51 हजार 480 रुपये इतका असेल.
पीपीएफ गुंतवणूक कॅल्क्युलेशन
जर तुम्ही पीपीएफ योजनेत दर वर्षी 1 लाख 35 हजार रुपये गुंतवणूक करत असाल तर 15 वर्षांत ही रक्कम 20 लाख 25 हजार रुपये इतकी होईल. यामध्ये 7.1 टक्के वार्षिक परताव्यासह व्याज असेल. या दोन्ही रकमा धरून तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम 36 लाख 61 हजार 388 रुपये इतकी असेल. या योजनेत जोखीम थोडी कमी आहे. तसेच पैसे व्याजासह परत मिळण्याची शंभर टक्के हमी आहे.