मुंबई इंडियन्सच्या विग्नेश पुथूरने आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात (IPL 2025) धमाकेदार प्रदर्शन केलं. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना त्याने रुतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि दीपक हुडासारखे मोठे खेळाडू बाद केले आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मुंबईने त्याला “इम्पॅक्ट प्लेयर” म्हणून संघात घेतलं आणि रोहित शर्माच्या जागी संधी दिली. पहिल्याच षटकात त्याने गायकवाडला झेलबाद केलं. त्यानंतर शिवम दुबेने चुकीचा फटका मारला आणि तिलक वर्माने त्याचा झेल घेतला. पुढे दीपक हुडालाही फक्त ३ धावांवर बाद केलं.
KL राहुल IPL 2025 च्या पहिल्या दोन सामन्यांना मुकणार, जाणून घ्या कारण
विग्नेश हा केरळच्या मल्लपुरमचा २४ वर्षांचा फिरकीपटू आहे. मुंबई इंडियन्सने त्याला ३० लाख रुपयांत संघात घेतलं. अजून त्याने केरळच्या वरिष्ठ संघाकडून सामना खेळलेला नाही, पण U-14 आणि U-19 स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सध्या तो केरळ क्रिकेट लीगमध्ये अल्लेप्पी रिपल्स या संघासाठी खेळतो. पूर्वी तो मध्यमगती गोलंदाज होता, पण स्थानिक क्रिकेटपटू मोहम्मद शरिफच्या सल्ल्याने त्याने लेग स्पिन करायला सुरुवात केली आणि त्याचा खेळ सुधारला. तो तामिळनाडू प्रीमियर लीगमध्येही खेळला आहे.
IPL 2025 च्या समालोचन पॅनलमधून इरफान पठाणला वगळले ? जाणून घ्या कारण
यंदा मुंबई इंडियन्सने त्याला SA20 साठी दक्षिण आफ्रिकेत नेट बॉलर म्हणून पाठवलं होतं, जिथे त्याने चांगला सराव केला. रचिन रवींद्र (65*) आणि रुतुराज गायकवाड (53) यांच्या चांगल्या फलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सनी विजय मिळवला. मुंबईचा संघ 155/9 धावसंख्येपर्यंतच पोहोचला.
मुंबईने सामना हरला असला तरी, विग्नेश पुथूरच्या 3-32 अशा शानदार गोलंदाजीमुळे तो संघासाठी मोठा प्लस पॉईंट ठरला.