Narendra Pawar:देशाची आध्यात्मिक क्षमता जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे इस्कॉनचे कार्य अभिमानास्पद

माय मराठी
2 Min Read

श्री नरसिंह चतुर्दशीनिमित्त माजी आमदार नरेंद्र पवार (Narendra Pawar)  कल्याणातील इस्कॉन केंद्राला दिली भेट

कल्याण ( शंकर जाधव )
आपली आध्यात्मिक संस्कृती आणि परंपरा गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे कार्य इस्कॉन संस्था करत असून ते आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार कल्याण पश्चिमेचे माजी भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी काढले.

कल्याण पश्चिमेतील अमृत पार्क येथे असलेल्या इस्कॉन केंद्राला श्री नरसिंह चतुर्दशीनिमित्त नरेंद्र पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते याठिकाणी आरती करण्यासह इस्कॉन केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा बक्षीस देऊन गौरवही करण्यात आला.

आजच्या घडीला जगामधील प्रत्येक लहान मोठ्या देशामध्ये इस्कॉन संस्थेचे केंद्र असून त्याद्वारे आपली संस्कृती, परंपरा आणि अध्यात्माची शक्ती आज संपूर्ण जगासमोर मांडली जात आहे. कारण भौतिक सुखामध्ये नाही तर आत्मिक सुखामध्येच खरे आयुष्याचे समाधान आहे याची जाणीव आता या परदेशी नागरिकांना होऊ लागली आहे. त्यामुळेच तर आज जगभरातील हजारो परदेशी नागरिक आपल्या संस्कृती आणि परंपरेचा स्वीकार करत आहेत. आणि यामध्ये निश्चितच इस्कॉन केंद्राचा खूप मोठा वाटा असल्याचेही आपण यावेळी नम्रपणे सांगितले.

तर कल्याणात सुरू झालेल्या या इस्कॉन केंद्राच्या प्रचार आणि प्रचारासाठी आपण तन आणि मन लावून काम करू. तसेच आपल्याकडून जे जे काही शक्य आहे ती सर्व आवश्यक मदतही आपण करू असे आश्वासनही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी दिले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाला कल्याण पश्चिमेतील इस्कॉनचे प्रमुख पदाधिकारी अनिरुध्द भगवान दास, प्रभानु दास, सीए उत्कर्ष मेहता, सीए निर्मल सिंग यांच्यासह अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more