आपलं स्वतः च हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी पैशांची बचत करून घर खरेदी (Joint Home Loan) करण्याचा अनेकांचा विचार असतो. तरीही एकाच वेळी रक्कम देऊन घर खरेदी करणे अनेकांना शक्य होत नाही. अशा वेळी घर खरेदी करण्यासाठी कर्जाचा पर्याय राहतो. सर्वात सोपा पर्यायही गृह कर्ज हा (Home Loan) मानला जातो. तुम्ही जॉइंट होम लोन होम लोन घेताना घेण्याचा (Joint Home Loan) विचार करू शकता. हे कर्ज सामान्य कर्जाच्या तुलनेत मिळणे अधिक सोपे आहे. यामध्ये कर्जाची रक्कम जास्तही असू शकते. जर पती आणि पत्नी दोन्ही प्रोफेशनल असतील तर जॉइंट होम लोन हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
जॉइंट होम लोन कुणासोबत घेऊ शकता
जॉइंट होम लोन कुणासोबतही घेऊ शकता. तरीही महिला जॉइंट अर्जदार असेल तर जास्त फायदा होतो. पती आणि पत्नी दोघे मिळून जॉइंट होम लोन घेऊ शकतात. जर पुरुष अविवाहित असेल तर अशावेळी माता पित्यांनाही अर्जदार बनवू शकतो.
रेडी टू मूव्ह इन घर vs. अंडर कंस्ट्रक्शन घर – कोणता पर्याय योग्य?
जॉइंट लोनवर कर सवलत
जर तुम्ही पत्नीसह जॉइंट लोनसाठी अर्ज केला तर दोघेही कलम 80 सी अंतर्गत आयकर सवलतीसाठी क्लेम करू शकतात. लोन प्रीपेमेंट केल्यानंतर व्याजात 2 लाखांची वेगवेगळी कर सवलत मिळेल. प्रिंसिपल रकमेवर एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये कर सवलत घेतली जाऊ शकते.
You Might Also Like
कमी व्याजदरात मिळेल कर्ज
काही बँका आणि NBFC महिला खरेदीदार असेल तर कमी दरात कर्ज उपलब्ध करून देतात. या कर्जाचा व्याजदर अर्ध्या टक्क्यांपर्यंत कमी असू शकतो. महिलेच्या नावे कर्ज असेल तर स्टँप ड्युटी आणि नोंदणी फी मध्ये सुद्धा काही सवलत मिळते. पण हे सर्व लाभ तेव्हाच मिळतील जेव्हा महिला संबंधित प्रॉपर्टीची को ओनर असेल.
पहिल्या घरावर अतिरिक्त सवलत
पहिल्यांदा घर खरेदी करत असाल होम लोनच्या व्याजावर 50 हजार रुपये (Home Loan Interest) अतिरिक्त कपात मिळते. परंतु यासाठी कर्जाची रक्कम 35 लाख आणि प्रॉपर्टीची किंमत 50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. व्याज दिल्यानंतर दीड लाख रुपयांची अतिरिक्त सूट मिळवण्यासाठी स्टँप ड्यूटीची व्हॅल्यू 45 लाख रुपये किंवा यापेक्षा कमी असावी.
नवीन घर घेताय, मग या गोष्टींची नक्की काळजी घ्या
क्रेडिट स्कोअरमध्ये होईल सुधारणा
जॉइंट होम लोन घेतल्यानंतर अर्जदारांचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) देखील सुधारतो. कारण होम लोन सर्वाधिक सुरक्षित कर्ज मानले जाते. जर तुमचा जोडीदार प्रोफेशनल असेल तर त्याच्या बरोबर होम लोन घेतल्याने कर्जाच्या हप्त्याचा भारही कुणा एकावर पडणार नाही.