किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना म्हणजे काय?
किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना 1998 मध्ये सुरू करण्यात आली आणि त्याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे आहे. या कर्जाचा वापर शेतकऱ्यांना बियाणे, खते, कृषी अवजारे आणि इतर शेतकरी गरजा पूर्ण करण्यासाठी केला जातो.
मार्च-एप्रिल 2024 पर्यंत, या योजनेअंतर्गत 7.75 कोटी सक्रिय खाती होती आणि एकूण 9.81 लाख कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. यावरून ही योजना शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट होते.
किसान क्रेडिट कार्ड योजनेत केलेले बदल :
2025 च्या अर्थसंकल्पात कर्जाची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाख रुपये केली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक पाठबळ मिळेल, तसेच डिजिटल आर्थिक समावेश सुद्धा साधता येईल.
किसान क्रेडिट कार्ड कसे कार्य करते?:
KCC मध्ये पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर (PIN) आणि इंटरनॅशनल आयडेंटिफिकेशन नंबर (IIN) असतो. हे मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड म्हणून कार्य करते. शेतकऱ्यांना आता ATM मधून पैसे काढण्यासाठी हे कार्ड वापरता येईल, ज्यामुळे गरजेच्या वेळी कर्जाची उपलब्धता सोपी होईल.
सुधारित व्याज अनुदान कार्यक्रम अंतर्गत, शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे.
अर्थसंकल्प 2025 मध्ये KCC योजनेला मुदतवाढ:
सरकारने 7.7 कोटी शेतकऱ्यांना KCC योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. विशेषतः लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, तसेच पशुपालन आणि मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळेल.
KCC योजनेचे नवे फायदे:
अर्थसंकल्प 2025 मध्ये सरकारने योजनेत अतिरिक्त 1 कोटी शेतकऱ्यांना सामाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा कर्ज आणि आर्थिक मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना होईल.
KCC वर सबसिडी:
KCC योजनेअंतर्गत,3 लाख रुपयांपर्यंत कर्जावर 7% व्याजदर आहे.जर शेतकऱ्याने कर्ज वेळेत परतफेड केली, तर त्याला 3% व्याज अनुदान मिळेल,ज्यामुळे अखेरचा व्याजदर 4% होतो.
महत्वाचे: तीन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतल्यास, शेतकऱ्यांना विविध बँकांचे व्याजदर लागू होतील. शेतकऱ्यांनी त्यांच्या संबंधित बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन किंवा कस्टमर केअर (customer care) कडून अधिक माहिती घेणे आवश्यक आहे.