KDMC:ऑल आऊट कॉम्बींग ऑपरेशन’ची धडक कारवाई २५ गुन्हे दाखल, ७८ हजारांचा दंड वसूल

माय मराठी
1 Min Read

कल्याण (KDMC) मध्ये ‘ऑल आऊट कोम्बींग ऑपरेशन’

डोंबिवली ( शंकर जाधव )

पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचे आदेशाननुसार परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत कल्याण व डोंबिवली  (KDMC)  शहरात शुक्रवार 9 तारखेला रात्री 10 वा ते शनिवार 10 तारखेला रात्री 1 वाजे पर्यंत ऑल आऊट कोंम्बीग ऑपरेशन राबविण्यात आले होते.
ऑल आऊट कॉम्बीग ऑपरेशन कारवाई मध्ये परिमंडळ ३ कल्याण मधील ४७ पोलीस अधिकारी व २०८ पोलीस अमंलदार सहभागी झाले होते.

ऑल आऊट कोम्बींग ऑपरेशनमध्ये शस्त्र जप्ती (भारतीय हत्यार कायदा ४,२५) ०३, अवैध धंदयावर कारवाई-०९, दारू विकी- ०६, दारूबंदी-०३, तंबाखुजन्य पदार्थ (कोप्ता) कारवाई- २६ केसेस, प्रतिबंधात्मक कारवाई- ८८, म. पोलीस कायदा क.१४२ ०२.

अंमली पदार्थ संबंधीत कारवाई ०७, अंमली पदार्थ सेवन-०७ याप्रमाणे एकुण २५ गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे फरारी आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्रीशिटर, हददपार इसमांना चेक करण्यात आले. सदर ऑल आऊट कोम्बींग ऑपरेशन कारवाई करीता १० ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती.

नाकाबंदी दरम्यान एकुण २७६ वाहने तपासण्यात येवुन, ६६ वाहनांवर मोटर वाहनर कायद्यान्वये ६६ कारवाई करण्यात येवुन ७८,७०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. यापुढेही कल्याण व डोबिवली शहरात ऑल आऊट कोम्बींग ऑपरेशन कारवाई सुरू राहणार आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more