Dombivli : डोंबिवलीत बेकायदा चार मजली इमारत पालिकेने जमीनदोस्त केली

माय मराठी
1 Min Read

डोंबिवली (Dombivli) डोंबिवलीत बेकायदा चार मजली इमारत पालिकेने जमीनदोस्त केली पूर्वेतील ठाकुर्ली खंबाळपाडा भागात असलेल्या पालिकेच्या उद्यानाच्या जागेवर अनधिकृतपणे बांधलेली चार मजली इमारत पालिकेच्या तोडकाम पथकाने जमीनदोस्त केली. फ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

ही बेकायदा इमारत चेतन माळी यांनी अधिकृत शंकेश्वर व्हिला इमारतीच्या शेजारील उद्यानासाठी राखीव जागेवर उभारली होती. या इमारतीला आधीच अनधिकृत घोषित करून चेतन माळी यांना ती स्वतःहून पाडण्याची नोटीस दिली होती. मात्र, त्यांनी ती न तोडल्यामुळे पालिकेने स्वतः ही कारवाई केली.

पालिकेने आधीच चेतन माळी यांच्याविरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिलेल्या आदेशानुसार, रिकाम्या बेकायदा इमारतींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश होते. त्यामुळे सहाय्यक आयुक्त मुंबरकर यांच्या नेतृत्वाखाली जेसीबी आणि शक्तिमान कापकाम यंत्राच्या सहाय्याने ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली.

खंबाळपाडा हा व्यवस्थित नियोजनबद्ध भाग आहे, आणि त्याच्या उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेवर बेकायदा इमारत उभारल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये मोठा रोष होता. या कारवाईमुळे या परिसरातील बेकायदा बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

नागरिकांची मागणी आहे की पालिकेने या उद्यानाच्या भूखंडाला तातडीने संरक्षित भिंत घालून सुरक्षित करावे, जेणेकरून भविष्यात पुन्हा अशी बेकायदा बांधकामे होणार नाहीत.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more