भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज KL राहुल IPL 2025 मधील दिल्ली कॅपिटल्सच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे त्याची पत्नी आणि अभिनेत्री आथिया शेट्टी गरोदर असून, पुढच्या महिन्यात त्यांच्या पहिल्या बाळाचा जन्म होणार आहे.
KL राहुलने हा गोड आनंद नोव्हेंबरमध्ये जाहीर केला होता, त्यावेळी भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होण्याच्या बेतात होता. त्यामुळे IPL 2025 च्या सुरुवातीला तो दिल्ली संघासोबत नसेल, असे समजते. ऑस्ट्रेलियन महिला संघाची कर्णधार आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची पत्नी अलिसा हीली हिनेही राहुलच्या अनुपस्थितीबद्दल बोलताना सांगितले की, तो पहिल्या काही सामन्यांसाठी उपलब्ध नसेल.
IPL 2025 मध्ये बदललेले “हे” नियम तुम्ही वाचले का?
हीलीने LisTNR Sport पॉडकास्टवर सांगितले की, “दिल्ली कॅपिटल्सकडे हॅरी ब्रूक नाही, त्यामुळे त्याच्या जागी कोण खेळेल हे पाहणं उत्सुकतेचं असेल. KL राहुल देखील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात नसण्याची शक्यता आहे, कारण तो लवकरच वडील होणार आहे. पण राहुल संघात असला की, तो संघासाठी खूप महत्त्वाचा ठरेल, कारण तो T20 मध्ये डाव सावरू शकतो आणि गरजेनुसार आक्रमक खेळ करू शकतो.”
IPL 2025 च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने KL राहुलला तब्बल 12 कोटी रुपयांना विकत घेतले होते. याआधी तो लखनौ सुपर जायंट्सकडून खेळत होता, पण लखनौने त्याला सोडून दिले. याच लिलावात दिल्लीचा माजी कर्णधार ऋषभ पंत लखनौने विकत घेतला, आणि त्यासाठी 27 कोटी रुपये मोजले. त्यामुळे आता दिल्ली आणि लखनौ हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात IPL 2025 च्या पहिल्या सामन्यात भिडणार आहेत, पण KL राहुल त्या सामन्यात खेळेल का, याबाबत शंका आहे. हा सामना 24 मार्चला विशाखापट्टणममध्ये होणार आहे.
पहिल्याच सामन्यावर पावसाचे सावट, IMD ने काय सांगितले?
You Might Also Like
KL राहुल दिल्ली संघाचा संभाव्य कर्णधार म्हणून चर्चेत होता. ऋषभ पंत लखनौकडे गेल्यानंतर दिल्ली संघ नवीन कर्णधार शोधत होता, आणि राहुल हा या पदासाठी प्रमुख स्पर्धक मानला जात होता. पण अखेर दिल्ली कॅपिटल्सच्या व्यवस्थापनाने अक्षर पटेलवर विश्वास दाखवत त्याला संघाचा कर्णधार बनवले. अक्षर पटेलने घरगुती क्रिकेटमध्ये गुजरात संघाचे नेतृत्व केले आहे आणि त्याचा अनुभव चांगला आहे. त्याचबरोबर, दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू फाफ डू प्लेसिस याला संघाचा उपकर्णधार नेमण्यात आले आहे.
IPL 2025 मध्ये KL राहुलचा पहिला सामना 5 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होण्याची शक्यता आहे. हा सामना चेन्नईच्या MA चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्यामुळे दिल्ली संघाच्या चाहत्यांना त्याच्या पुनरागमनसाठी थोडा वेळ वाट पाहावा लागणार आहे.
IPL 2025 च्या समालोचन पॅनलमधून इरफान पठाणला वगळले ? जाणून घ्या कारण
दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या पहिल्या काही सामन्यांत राहुलच्या अनुपस्थितीची झळ बसणार का? कोणत्या खेळाडूला संधी दिली जाईल? याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. राहुलचा अनुभव आणि त्याची खेळशैली संघासाठी महत्त्वाची ठरू शकते, त्यामुळे तो कधी मैदानात परततो याची उत्सुकता वाढली आहे!