Ankita Walawalkar : सोशल मीडियावर आपल्या खास पोस्टमुळे चर्चेत असलेली कोकणहार्टेड गर्ल म्हणजेच इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकर लवकरच विवाहबंधनात बांधणारआहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनमध्ये झळकलेली अंकिता तिच्या कोकणी भाषेच्या गोडव्यामुळे आणि मनमोकळ्या स्वभावामुळे चाहत्यांच्या मनात घर करून बसली आहे.
बिग बॉस मराठी नंतर अंकिताच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. ती शोमधून बाहेर आल्यानंतर तिने तिच्या जोडीदाराची, म्हणजेच कुणाल भगतची, चाहत्यांना ओळख करून दिली. सुरुवातीला चर्चा होती की, अंकिताचं लग्न फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे. मात्र, अलीकडेच सोशल मीडियावर त्यांच्या लग्नपत्रिकेचा एक फोटो व्हायरल झाला, ज्यात 16 एप्रिल 2025 ही तारीख दिसत आहे.
अंकिता आणि कुणालने अधिकृतपणे लग्नाची तारीख जाहीर केलेली नसली तरी, त्यांच्या कुटुंबात लग्नाच्या तयारीला वेग आला आहे. दोन्ही घरांमध्ये केळवण, देवदर्शन आणि लग्नसोहळ्याच्या तयारीची धामधूम सुरू झाली आहे. लवकरच हे दोघेही प्री-वेडिंग फोटोशूट करताना दिसतील, आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातील. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता फक्त अंकिताच्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!