liquor: अबब! फक्त एकाच वर्षात 52 हजार कोटींची दारू फस्त

माय मराठी
2 Min Read

राज्य सरकारांना मद्यविक्रीतून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मद्यविक्री (liquor) सरकारच्या उत्पन्नातील महत्वाचा घटक आहे. त्यामुळे देशभरात मद्यविक्री अगदी जोरात सुरू आहे. आता तुम्हाला विश्वास बसणार नाही पण फक्त एकाच वर्षात तब्बल 52 हजार कोटींची दारू लोकांना रिचवल्याची बातमी आली आहे.

भारतातीलच उत्तर प्रदेश राज्याची ही बातमी आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या अबकारी विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल मिळवला आहे.

या वर्षात तब्बल 52 हजार 297 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षातील 45 हजार 570 कोटी रुपयांच्या तुलनेत यामध्ये 6 हजार 726 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

अबकारी विभागाचे आयुक्त डॉ. आदर्श सिंह यांनी सांगितले की विभागाने चांगले प्रयत्न केले. त्यामुळे उत्पन्न वाढवण्यात यश मिळाले आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात 41 हजार 252 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. 2023-24 या आर्थिक वर्षात यापेक्षा 4 हजार 318 कोटी रुपये जास्त मिळाले. याच पद्धतीने 2024-25 या आर्थिक वर्षात उत्पन्नात वाढीचा दर 14.76 टक्के राहिला आहे.

अबकारी विभागाने राज्यात बनावट दारूच्या उत्पादनावरही प्रभावी कारवाई केली. अनेक ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. मागील दोन आर्थिक वर्षांप्रमाणेच याही वर्षात अवैध दारूच्या सेवनाची दुर्घटना घडलेली नाही. या पद्धतीने अबकारी विभागाने कामकाज केले. त्याचे परिणाम आता दिसून आले आहेत.

राज्य सरकारच्या महसूलात मोठी वाढ झाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षातील 45 हजार 570 कोटी रुपयांच्या तुलनेत महसुलात 2024-25 या वर्षात 6 हजार 726 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more