Loan on PPF Account: PPF खातेवर मिळवा कमी व्याजावर लोन, तुमच्या आर्थिक गरजांसाठी एक उत्कृष्ट पर्याय

माय मराठी
2 Min Read

आपल्याला अचानक कधी हि पैशांची गरज भासते अशा वेळी व्यक्तीच्या मनात सगळ्यात आधी जो विचार येतो हो म्हणजे तातडीने लोन घेणे. अशा परिस्थितीत बहुतेक लोक Personal Loan घेण्याचा विचार करतात, पण त्यावर व्याजदर खूप जास्त असतो. मात्र, तुम्हाला फक्त 1 टक्के अतिरिक्त व्याजावर लोन मिळू शकते आणि तेही सरकारी योजनेअंतर्गत. Public Provident Fund खाते असलेल्या व्यक्तींना या (Loan on PPF Account) योजनेचा फायदा मिळू शकतो. जर तुम्ही सध्या लोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही योजना तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते.

PPF योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळते आणि गरज पडल्यास तुम्ही त्यावर लोनही घेऊ शकता. विशेष म्हणजे, हे लोन घेण्यासाठी कोणतेही जामीनदार, उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा महागडे कागदपत्र लागणार नाहीत. तसेच, कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही, त्यामुळे हे सुरक्षित लोन आहे. Personal Loan च्या तुलनेत PPF लोनचे व्याजदर अत्यंत कमी आहेत. जर तुम्ही PPF वर लोन घेतले, तर तुम्हाला फक्त 1 टक्के अतिरिक्त व्याज भरावे लागते. म्हणजेच, जर PPF गुंतवणुकीवर 7.1 टक्के व्याज मिळत असेल, तर लोन घेतल्यास तुम्हाला 8.1 टक्के व्याज द्यावे लागेल. PPF वर मिळणारे लोन 36 महिन्यांच्या आत फेडणे बंधनकारक आहे. जर तुम्ही वेळेत परतफेड केली नाही, तर व्याजदर वाढून 1 टक्क्याऐवजी 6 टक्के अतिरिक्त व्याज लागेल, म्हणजेच तुम्हाला 13.1 टक्के वार्षिक व्याज भरावे लागेल. त्यामुळे वेळेत EMI भरल्यासच हे लोन फायदेशीर ठरू शकते.

PPF खाते हे दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीचे साधन आहे आणि ते परिपक्व झाल्यावर त्यावरील व्याज पूर्णपणे टॅक्स-फ्री असते. तसेच, PPF मध्ये गुंतवणुकीला कंपाऊंडिंगचा (व्याजावर व्याज) फायदा मिळतो, त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीत मोठा परतावा मिळतो. मात्र, जर तुम्ही PPF वर लोन घेतले, तर त्या रकमेवर तुम्हाला व्याजाचा लाभ मिळणार नाही. तसेच, PPF खाते उघडल्यावर पहिल्या 5 वर्षांत फक्त एकदाच लोन घेता येते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, गरज असेल तेव्हाच PPF वर लोन घ्यावे आणि शक्यतो दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी याचा उपयोग करावा.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more