LPG सिलिंडरच्या दरात वाढ , देशातील विविध शहरात सिलिंडरची किंमत किती असणार?

माय मराठी
2 Min Read

१ मार्चपासून एलपीजी गॅस (LPG gas) सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका बसला असून, तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर ६ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता १,८०३ रुपये झाली आहे. याआधी हा दर १,७९७ रुपये होता. मुंबईत १,७५५ रुपये, कोलकात्यात १,९१३ रुपये आणि चेन्नईमध्ये १,९६५ रुपये एवढी किंमत ठरवण्यात आली आहे.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि लघुउद्योग यांना मोठा फटका बसणार आहे. आधीच महागाईमुळे अडचणीत असलेल्या व्यवसायिकांसाठी ही वाढ आर्थिक ताण वाढवणारी ठरणार आहे. अनेक व्यापारी आणि हॉटेल चालकांनी सरकारकडे अनुदान किंवा सवलत देण्याची मागणी केली आहे. सामान्य नागरिकांसाठी मात्र काहीसा दिलासा देण्यात आला आहे. घरगुती वापरासाठी असलेल्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे किमान घरगुती बजेटवर याचा तात्पुरता तरी परिणाम होणार नाही. मात्र, मागील काही वर्षांत घरगुती गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे.

१ मार्च २०२५ पासून हे नवे दर देशभर लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता व्यावसायिकांना वाढीव दराने गॅस सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे. तेल कंपन्यांनी याआधीही अनेक वेळा दरवाढ केली असून, भविष्यात अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, तर एलपीजीच्या किमती आणखी वाढू शकतात. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आणि व्यावसायिकांना अधिक आर्थिक ताण सहन करावा लागू शकतो.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more