Mega Block: प्रवाशांनो, इकडे लक्ष असू द्या मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

माय मराठी
2 Min Read

मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवार मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे तसेच सणासुदीच्या काळामुळे पश्चिम रेल्वेमार्गावर प्रवाशांना या रविवारी ब्लॉकपासून सुटका असणार आहे.

मध्य रेल्वे

स्थानक – ठाणे ते कल्याण
वेळ – सकाळी १०.४० ते दुपारी ३.४०
मार्ग – अप आणि डाउन जलद

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी १०:४० ते दुपारी ३:४० वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. जलद मार्गावरील लोकलची वाहतूकया काळात धीम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. परिणामी लोकल गाड्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने धावणार आहेत तसेच सीएसएमटी-दादर स्थानकातून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व मेल-एक्स्प्रेस कल्याण ते ठाणे-विक्रोळी स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.

हार्बर रेल्वे

स्थानक – पनवेल ते वाशी
वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५
मार्ग – अप आणि डाउन

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. वाशी ते पनवेल दरम्यानची लोकल वाहतूक ब्लॉक दरम्यान बंद राहणार आहे तसेच नेरुळ ते पनवेल दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल बंद राहणार आहे. ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.

दादर प्लॅटफॉर्म ४ वरील जिना १५ दिवस बंद

दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर असलेल्या फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) दुरुस्तीसाठी १६ मार्च ते ३० एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या एफओबीचा उत्तरेकडील जिना बंद राहील. या पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम आज, शनिवारी मध्यरात्रीपासून ते ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. प्रवाशांना पुलाच्या उत्तर दिशेकडील पायऱ्यांचा वापर यामुळे करता येणार नाही. पर्यायी पुलांचा वापर प्रवाशांनी करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे. या काळात त्यामुळे प्रवाशांनी इतर एफओबी वापरावा, अशी विनंती ‘परे’ने केली आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more