स्वतःच घर घ्यायचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. म्हाडा (MHADA) पुन्हा एकदा आपल्या स्वप्नातील घर मिळवण्याची संधी देण्यासाठी सज्ज झाली आहे. म्हाडा लवकरच 2 हजार घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी तयार राहा आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी सोडू नका.
म्हाडा कोकण मंडळाने नुकत्याच झालेल्या लॉटरीत अनेकांना घरे मिळाली, तर काही जणांचे स्वप्न अधुरे राहिले. पण आता पुन्हा एकदा म्हाडा कोकण मंडळ नव्या गृहनिर्माण योजनेसह येत आहे. या योजने अंतर्गत २ हजार नवीन घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. चितळसर येथील सर्वाधिक म्हणजेच ११७४ घरे उपलब्ध असतील. ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या घरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरवर्षी म्हाडा राज्यभरात सुमारे ३० हजार घराची लॉटरी काढण्याचे नियोजन करत आहे. गेल्या दीड वर्षात कोकण मंडळाने तिन्ही लॉटरीत सुमारे १० हजार कुटूंबांचे घरचे स्वप्न साकार केले. या वर्षी पुन्हा २ हजार घरांसाठी लॉटरीची तयारी सुरु झाली आहे. या योजनेत म्हाडाने स्वतः उभारलेल्या घरांसह १५ टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजना आणि २० टक्के सर्वसमावेश योजनेतून मिळालेल्या घरांचाही समावेश असणार आहे.
म्हाडाने चितळसर येथे २२ मजल्याच्या ७ इमारती तयार केल्या आहेत. परंतु या परिसरातील पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या सुविधांबाबत काही अडचणी असल्याने ठाणे महानगर पालिकेने अद्याप ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर येथील घरे लॉटरीमध्ये समाविष्ट होतील आणि अधिक लोक्कांना त्याचा लाभ घेता येईल.