Dombivli: आमदार राजेश मोरे यांची दुरावस्था झालेल्या रस्त्याची नागरिकांबरोबर फिरून पाहणी

माय मराठी
1 Min Read

डोंबिवली  (Dombivli) ( शंकर जाधव )

कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, पिसवली परिसरातील दुरावस्थ झालेल्या रस्त्याची थेट नागरिकांसोबत पाहणी केली. मंत्रालयातील कामकाज आटोपून कोणतीही विश्रांती न घेता ते थेट पिसवलीत पोहोचले. पिंगारा हॉटेलच्या मागील रस्त्यावर गटारातील सांडपाणी रस्त्यावर वाहत असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी त्यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहिल्या.

आमदार मोरे यांना परिसरात पाहून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या. नागरिकांच्या भावना समजून घेत त्यांनी रस्त्याची तातडीने दुरुस्ती व गटारांची सफाई यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून तातडीने निर्देश दिले.

यावेळी बोलताना आमदार मोरे म्हणाले, मी लोकप्रतिनिधी आहे आणि माझे कर्तव्य म्हणजे नागरिकांच्या अडचणी वेळेत सोडविणे. प्रशासन वेळ देत नसल्यास, मी स्वतः पुढे येईन. त्यांच्या या तत्परतेबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले.

या पाहणी दरम्यान आमदार मोरे यांच्यासोबत डोंबिवली शहर सचिव तथा विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सिताराम चव्हाण, पिसवली येथील उपतालुकाप्रमुख विलास भोईर, शाखाप्रमुख जयेश माळी, उपविभागप्रमुख सुभाष पार्चा, स्थानिक शिवसैनिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more