MPSC UPSC:एमपीएससी परीक्षा आता यूपीएससी प्रमाणे;मुख्यमंत्र्यांची घोषणा,विरोध मान्य नाही

माय मराठी
2 Min Read

(MPSC UPSC) परीक्षा आता च्या धर्तीवर; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणाराज्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि तत्सम पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाते. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये एमपीएससीच्या कारभाराबाबत नाराजी दिसून येते. प्रक्रियेत होणाऱ्या दिरंगाईमुळे आणि अधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे अनेक वेळा विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागते. परीक्षांचे निकाल आणि नियुक्ती प्रक्रियेतही विलंब होत असल्याचे आरोप वारंवार होत असतात.

याच पार्श्वभूमीवर, आमदार शिवाजीराव गर्जे यांनी विधानसभेत एमपीएससी संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, भविष्यात मोठ्या प्रमाणावर एमपीएससी भरती होणार असून यूपीएससीप्रमाणेच एमपीएससीसाठी देखील वार्षिक परीक्षा कॅलेंडर जारी केले जाईल.

MPSC परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या वर्षापासून MPSC परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह (वर्णनात्मक) स्वरूपात घेतली जाणार आहे. काहींनी या बदलाला विरोध दर्शवला असला तरी, तो मान्य केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रिक्त पदे लवकरच भरली जाणार
MPSC मंडळात सध्या काही पदे रिक्त असून, त्यातील एक पद भरले गेले आहे, तर उर्वरित दोन पदांसाठी लवकरच नियुक्त्या करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, आयोगाच्या कामकाजात गती आणण्यासाठी MPSCच्या पूर्ण रचना पुनर्रचित (Restructure) केली जाणार आहे.

MPSC परीक्षांचे मराठीकरण
सध्या अभियांत्रिकी आणि कृषी विषयक तांत्रिक पदांसाठीच्या परीक्षा इंग्रजीमध्ये घेतल्या जातात, कारण त्यांचे अभ्यासक्रम मराठीत उपलब्ध नाहीत. मात्र, आता ही सर्व तांत्रिक पदांची परीक्षा मराठीत होईल आणि त्यासाठी आवश्यक पुस्तकेही मराठीत उपलब्ध करून दिली जातील, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
MPSC आयोगात एकूण पाच सदस्य असायला हवेत, मात्र सध्या तीन पदे रिक्त आहेत. या रिक्त जागांमुळे आयोगाच्या कामकाजावर परिणाम होत असून, परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत उशीर होत आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही पदे तातडीने भरावीत, अशी विनंती केली आहे.

भविष्यात मोठ्या प्रमाणात भरती
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, एमपीएससीच्या सर्व रिक्त पदांची लवकरात लवकर भरती करण्यात येईल. तसेच, निकालाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातील.

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे MPSC परीक्षा UPSCच्या धर्तीवर अधिक नियोजनबद्ध आणि पारदर्शक होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची सुधारणा असणार आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more