Mumbai : बेस्ट उपक्रमातील डागा ग्रुप, मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट, बी.व्ही.जी. इंडिया आणि इतर खासगी कंपन्यांच्या बसगाड्यांवर काम करणारे कर्मचारी ‘समान कामाला, समान वेतन’ या मागणीसाठी २५ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
बेस्टच्या सार्वजनिक बस सेवेतील कायमस्वरूपी कर्मचारी आणि कंत्राटी पद्धतीने काम करणारे कर्मचारी समान काम करतात. मात्र, वेतन आणि सुविधा यात मोठी तफावत आहे. काम वर्षभर सुरू राहणारे असल्याने, कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसारखे वेतन आणि सेवा शर्ती मिळाव्यात, अशी त्यांची मागणी आहे.
आंदोलनाचा कार्यक्रम:
२५ फेब्रुवारी दुपारी १२.३० वाजता आझाद मैदानात मोर्चा
उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येणार
संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले की, कामगारांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील.