मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरासाठी 238 नवीन वातानुकूलित लोकल ट्रेन (Mumbai local) आणण्याच्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातील माहिती बुधवारी संसदेत दिली.
मुंबईची लोकल ट्रेन ही इथल्या नागरिकांसाठी जीवनवाहिनी आहे. लाखो लोक रोज याच लोकलने प्रवास करतात. पश्चिम, मध्य आणि हार्बर या तीन मुख्य मार्गांवरून लोकल धावत असते. तसेच, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि पनवेलसारख्या भागांतूनही मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात. त्यामुळे लोकलमध्ये कायम गर्दी असते. ही गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अशातच, रेल्वे मंत्रालयाने 238 नवीन लोकल सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई ते बदलापूर Metro मार्ग लवकरच सुरू – प्रवास होणार वेगवान आणि सोयीस्कर
मुंबईतील प्रवाशांकडून अनेक वर्षांपासून लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जात होती. वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, त्यामुळे अधिक लोकल गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी होती. आता या मागणीवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक विचार करत मुंबईसाठी नवीन 238 लोकल गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत सांगितले की, मुंबईसाठी उच्च दर्जाच्या 238 लोकल गाड्या तयार केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नवीन तंत्रज्ञानावर आधारित डब्यांबाबत चर्चा झाली आहे. यामध्ये जुन्या लोकल गाड्या बदलून नव्या, अधिक आधुनिक आणि सोयीस्कर डबे आणले जाणार आहेत.
टाकी फुल करण्याआधी वाचा महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर
पनवेल आणि कर्जत रेल्वे मार्गाच्या कामाला मोठ्या प्रमाणावर गती मिळाली आहे. शनिवारी या प्रकल्पात एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला. मोहोपे स्टेशनवरून पहिल्यांदाच ‘एंड अनलोडिंग रेक’ चालवण्यात आला. या खास रेकच्या मदतीने 260 मीटर लांब आणि 60 किलो वजनाचे रेल पॅनेल वाहून नेले गेले. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास या रेकची चाचणी घेण्यात आली. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पनवेल-कर्जत मार्गावर लांब वेल्डेड रेल्वे ट्रॅक बसवले जातील. यापूर्वी, तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यात आलेल्या रेकच्या मदतीने मोहोपे-चिखलेदरम्यान ट्रॅक जोडण्याचे काम पूर्ण झाले होते. आता खास डिझाइन केलेले रेक आल्यानंतर नवीन ट्रॅक टाकण्याचे काम वेगाने सुरू होईल.
प्रवासी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, सरकारने आता लोकलच्या भाडे रचनेवरही पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे. मुंबईतील लोकल ट्रेन नेटवर्क गर्दीच्या वेळी अत्यंत भरलेले असते. त्यामुळे या नव्या गाड्यांच्या समावेशामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल आणि प्रवास अधिक आरामदायी होईल, अशी अपेक्षा आहे.