Mumbai : समय रैनाला सायबर विभागाचा दुसरा समन्स, १७ फेब्रुवारीला चौकशीला हजर राहण्याचे आदेश

माय मराठी
2 Min Read

Mumbai : ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने कॉमेडियन समय रैनाला दुसऱ्यांदा समन्स पाठवले असून, १७ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. समय सध्या परदेशात असल्यामुळे त्याच्या वकिलांनी अधिक वेळ मागितला होता. मात्र, सायबर विभागाने ती मागणी फेटाळून लावली.

या प्रकरणात समय रैना, यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि इतर ३० जणांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोचे १८ भाग प्रसिद्ध झाले होते, आणि ते हटविण्यासाठी सायबर विभागाने यूट्यूबला पत्र पाठवले. शोमध्ये अश्लील टिप्पण्या आढळल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाणार असून, प्रेक्षकांनाही साक्षीदार म्हणून समाविष्ट केले जाणार आहे.

समय रैनाच्या शोमध्ये विविध क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्ती परीक्षक म्हणून येतात. एका एपिसोडमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा हे परीक्षक होते. त्यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला आई-वडिलांबाबत अश्लील प्रश्न विचारले होते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि खार पोलिस ठाण्यातही प्राथमिक चौकशी सुरू आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या पहिल्या सहा भागांमध्ये सहभागी झालेल्या सर्वांवर कारवाईची तयारी केली आहे. याच दरम्यान, समय रैनाने ‘एक्स’वर (माजी ट्विटर) पोस्ट करत, आपल्या यूट्यूब चॅनलवरून ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व एपिसोड डिलीट केल्याचे सांगितले. तो म्हणाला, “जे काही घडत आहे, ते मला खूप जड जात आहे. माझा उद्देश फक्त लोकांना हसवणे आणि मनोरंजन करणे होता. तपास यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करेन.”

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more