Natural Painkillers : आई च्या ठेवणीतील काही नॅचरल पेनकिलर्स

माय मराठी
4 Min Read

Natural Painkillers : हल्ली सर्रास केमिकॅल युक्त अश्या पेनकिलर चा वापर होताना आपण पाहत असतो. अनावश्यक वापर जर तुम्ही देखील करत असाल तर ते आत्ताच थांबवा कारण त्यामुळे तुमच्या शरीरावरती अत्यंत दुष्परिणाम होऊ शकतात. बऱ्याचदा आपण पाहतो आपल्या अवतीभोवती काही अशी मंडळी असते ज्यांच्याकडे आपण बोललोत कि मला अमुक अमुक त्रास होत आहे तर ती मंडळी आपल्याला लगेच एक पेन किलर काढून देते. आवश्यक अश्या वेळी हे योग्य हि आहे परंतु डॉक्टरांचा सल्ल्या शिवाय कोणतीही पेनकिलर घेणे धोका दायक ठरू शकते. अनेकदा काही माणसांना पेनकिलर ची एक सवय लागलेली असते जस कि थोडी जरी सर्दी झाली. डोकं दुखलं, महिलांमध्ये पाळीच्या वेळेस पोट दुखी झाली असल्यास ते लगेच पेनकिलर चा मारा करतात. एखादी वेदना आपण सहन करू शकत असू तर ती शक्य तेवढी सहन करून काही घरगुती उपाय करून थांबवावी. आणि जर वेदना असहाय्य असेल तर ताबडतोप डॉक्टरांचा सल्ला घेणे.

तर याच सगळ्या गोष्टींवर एक तोडगा म्हणून आपल्याच आज्जी आजोबांनी सांगितलेले आणि आयुर्वेदापासून सुचलेले काही उपाय उपरून बघुयात…

अंग दुखी आणि थकवा :
खूप अंग दुखी होत असेल आणि थकवा आला असेल तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधामध्ये हळद टाकून प्या. आणि खोबरेल तेलामध्ये दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या ठेचून ते गरम करून तुमच्या तळ पायाला लावा. अगदी शांत आणि लवकर झोप लागण्यास तुम्हाला मदत होईल.

गुढघे दुखी :
तुमच्या गुढघ्यामध्ये आणि पायांमध्ये अतिशय कळा येत असतील तर खोबरेल तेल आणि तिळाच्या तेलामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या टाकून ते गुढघ्यांना लावा, यानी बऱ्याच प्रमाणात होणार त्रास कमी होईल.

दात आणि हिरडे दुखी :
दात आणि हिरड्या अचानकपणे ठणकत असेल तर जिथे वेदना होत आहे आहे तिथे एक लवंग नहितर चिमूट भर मीठकाळ धरून ठेवावे, त्यांनी दातात आणि हिरडी मध्ये येणारी कळ कमी होऊ शकते.

महिलांची पाळी समस्या :
महिलांना पाळीच्या वेळेस होणार भयंकर त्रास कमी करण्यासाठी गरम पाणी आणि थंड पाणी याचा अल्टरनेट शेक दिल्याने त्या वेदना कमी होतात. बाहेरच खाणं टाळून घरगुती जेवण यावेळेस करा.

छातीमध्ये जळजळ :
छातीमध्ये जळजळ होत असल्यास जिरे पाणी पिऊन बघा आणि तसेच भाजलेला ओवा तोंडात ठेऊन चघळा. शक्य तेवढे जास्त पाणी प्या आणि सकाळी उठल्या नंतर उपाशी पोटी एक तुळशीचं पान खा.

सर्दी, कफ आणि खोकला :
सर्दी, कफ आणि खोकला झाल्या नंतर मेडिसिन घेऊन हि अशक्त पणा जाणवत असेल तर रुमालामध्ये थोडं निलगिरीच्या तेलाचे एक दोन थेंब टाकून त्याचा वास घ्या, लोखंडी तव्यावरती ओवा भाजून तो एका कॉटनच्या कपड्यात बांधून रात्र भर ते छातीवर ठेऊन द्या. सकाळी उठल्या नंतर गरम पाण्यात थोडस तूप, हळद आणि तुळशीचे पान टाकून ते प्या आणि ते पाणी पोटातून पुन्हा बाहेर काढा त्यानी कफ कमी होण्यास मदत होते.

आपल्या घरात नाहीतर आपल्या आजूबाजूला काही अशी वृद्ध मंडळी असते जी वारंवार आपल्याला अश्या काही घरगुती औषधांचा वापर करा असे सांगत असते. परंतु अपल्याला पेनकिलर खाऊन इन्संट रिलिफ हवा असतो. असे न करता जर आपण काही घरगुती उपाय वापरले तर नक्कीच आपण पेनकिलर चे शिकारी होणार नाही. प्रत्येक हवामानात येणाऱ्या ज्या त्या ताज्या भाज्या खा, फळे खा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. सुखी आणि समृद्ध जीवनाचा आस्वाद घ्या.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more