NAVI MUMBAI: नवी मुंबई पोलिसांची कामगिरी उंचावली: गुन्हे उघडकीस आणण्यात ३% वाढ

माय मराठी
1 Min Read

नवी मुंबई (NAVI MUMBAI) पोलीस दलाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून गुन्हे उघडकीच्या प्रमाणात तीन टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालाच्या माध्यमातून आज वार्षिक पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होती या पत्रकार परिषदेमध्ये 2023 2024 मध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा तपशील आणि उघडकीस आलेले गुन्हे जप्त केलेली मालमत्ता इतर बाबींविषयी अधिकृत माहिती देण्यात आली.

दरम्यान, २०२३ मध्ये ६६५६ गुन्हे दाखल होते त्यापैकी ४८९३ गुन्हे उघडकीस आले. तर २०२४ वर्षामध्ये ७३६९ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ५६७७ गुन्हे उघडकीस आले. त्यामुळे २०२३ च्या तुलनेमध्ये सन २०२४ मध्ये पोलिसांमार्फत गुन्हे उघडकीच्या प्रमाणात ३ % वाढ झालेली आहे.

तर वर्ष २०२४ मध्ये ७३६९ गुन्हे उघडकीस आणले असून त्यापैकी शरीरविवृद्ध ७८५ गुन्हे उघडकीस आणले तर मालमत्तेविषयक ११७६ गुन्हे उघडकीस आणले , आर्थिक फसवणुकीबाबत ४२१ गुन्हे उघडकीस आणले आहेत.. त्याचसोबत महिला विषयक ६१६ गुन्हे उघडकीस आणले आहेत.. तर अंमलबजावणीचे १३६२ गुन्हे उघडकीस आणण्यात नवी मुंबई पोलीस दलाला यश आलेलं आहे..
दरम्यान नवी मुंबई परिसरात गुन्हेगारांची संख्या जरी वाढली असली तरी पोलिसांमार्फत कारवाईचे प्रमाण देखील वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more