गेले काही महिन्यांपासून सोन्याच्या किंमती (Gold Rate) गगनाला भिडल्या आहेत. यामध्ये दररोज भाव वाढ उच्चांक गाठत आहे. येत्या काही दिवसात सोनं एक लाख रुपये प्रति तोळा होणार असल्याचा देखील अंदाज लावला जात आहे. मात्र या दरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सोनं तब्बल 40 टक्क्यांनी खाली येणार आहे. पाहुयात हा अंदाज नेमकी कोणी वर्तवला आहे?
अमेरिकेमधील एका विश्लेषक हा अंदाज वर्तवला आहे की, येत्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमती प्रचंड कोसळणार आहे. मॉर्निंगस्टार या संस्थेचे विश्लेषक जॉन मिल्स यांनी हे भाकीत केलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की, सोनं तब्बल 38 ते 40 टक्क्यांनी हे घटणार आहे.
त्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये 90000 रुपये प्रति तोळा असलेली 24 कॅरेट सोन्याची किंमत जवळपास 55 हजार रुपये प्रति तोळा होण्याची शक्यता आहे. तर अमेरिकेमध्ये हेच भाव आताच्या तीन हजार डॉलर प्रति तोळा वरून थेट 1, 820 डॉलर प्रति तोळा होण्याची शक्यता आहे.
ही घट होण्यामागील कारण देखील त्यांनी सांगितले आहेत. यामध्ये आर्थिक अनिश्चितता महागाईची चिंता आणि जिओ पोलिटिकल टेन्शन यामुळे शेअर बाजारातून गुंतवणूकदारांची सोन्याकडे एवढा वाढला होता सोन्याचे किमती प्रचंड वाढ झाली होती. मात्र आता सोन्याचा पुरवठा वाढला आहे. त्याचबरोबर मागणी देखील कमी झाली आहे. तसेच सोन्याच्या बाजारामध्ये देखील मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू असल्याने त्याचा परिणाम किमतींवर होणार आहे.