Orchard Farming :फळबाग लागवडीला उज्ज्वल भविष्य

माय मराठी
1 Min Read

ठाणे जिल्हा भात पिकाबरोबरच आंबा, काजू, चिकू (Orchard) या पिकांसाठी ओळखला जातो. आता जिल्ह्यात भाजीपाल्याबरोबरच शेतकरी अनेक फळपिकांना प्राधान्य देऊ लागले आहेत. जिल्ह्यात फळ पिकांच्या लागवडीचे क्षेत्र आता ३३४२.९१ हेक्टर पर्यंत पोचले आहे.

२०२३-२४ मध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत दोन हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे. सध्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात दोन्ही योजना मिळून मोठ्या प्रमाणात लागवड पूर्ण झाली आहे. फळ पिकांच्या क्षेत्रात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिक हेक्टरने वाढ झाली आहे.

यात प्रामुख्याने आंबा, चिकू, काजू , जांभूळ या पिकांची सर्वाधिक लागवड असून, या पिकांच्या लागवडीकडे कल आहे.
फळलागवडीतून शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल हा फळवाढीकडे वाढला असल्याचे सांगण्यात आले.

फळलागवड ठरतेय फायदेशीर
फळलागवड हि पारंपरिक शेतीपेक्षा अधिक फायदेशीर ठरत आहे. भात आणि भाजीपाला यासारख्या पिकांमध्ये वाढलेला खर्च आणि बाजारभावाची अनिश्चितता लक्षात घेता शेतकरी आता उत्पन्न खात्रीसाठी फळ पिकांकडे वळत आहे.

फळबागांसाठी आता सुविधा चांगल्या मिळत आहेत. जिल्ह्यात सिंचनाची सुविधा वाढली आहे. यासह फळ पिकांच्या लागवडीसाठी सरकारकडून अनुदानही मिळते. यासह फळ पिकांसाठी विमा योजना लागू आहेत. निसर्गाचा फटका बसला तरी शेतकऱ्यांच्या फळ पिकांना विम्याचे संरक्षण असते.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more