Palghar: जिल्हाध्यक्षपदी मनसेच्या समीर मोरे यांची फेरनियुक्ती स्थानिक संघटना बळकट करण्यावर भर

माय मराठी
2 Min Read

पालघर (Palghar)

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीला गती देण्यास सुरुवात केली असून, याअंतर्गत माजी जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील राजगड या मनसेच्या मुख्य पक्ष कार्यालयात ही घोषणा करण्यात आली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पालघर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यामध्ये पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीवर भर देण्यात आला असून, जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात स्वतंत्र आणि सक्रिय नेतृत्व तयार करण्याचा मानस आहे.

नव्या जबाबदाऱ्या आणि संघटनात्मक फेरबदल

समीर मोरे यांच्याकडे पालघर आणि डहाणू विधानसभा क्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

विद्यमान जिल्हाध्यक्ष भावेश चुरी यांच्याकडे बोईसर आणि विक्रमगड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे.

यासह पक्षात काही इतर पदांमध्येही फेरबदल होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांकडून समजते.

अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये संघटना विस्तार, युवकांचं प्रतिनिधित्व, आदिवासी भागात मनसेचा प्रभाव वाढवणे, आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित आंदोलनात्मक भूमिका यावर सखोल चर्चा झाली. अमित ठाकरे लवकरच पालघर जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

उपस्थित मान्यवर पदाधिकारी:

  • या बैठकीस मनसेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते:
  • ग्रामीण जिल्हाध्यक्ष भावेश चुरी
  • उपजिल्हाध्यक्ष विशाल जाधव, विपुल पटेल
  • डहाणू तालुकाध्यक्ष यशोधन पाटील
  • विक्रमगड तालुकाध्यक्ष योगेश पाटील
  • मनविसे जिल्हाध्यक्ष धीरज गावड, उपजिल्हाध्यक्ष विजय गांगुर्डे
  • पालघर शहर अध्यक्ष निशांत धोत्रे, तसेच सागर शर्मा, तन्मय संखे, सत्यम मिश्रा, सिद्धेश महाले, हमेश पाटील, नवल मोरे
  • आलेवाडीचे उपसरपंच सतीश ठाकूर, मंदार तांडेल, हर्षल ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more