(पालघर) संदिप साळवे
आदिवासी आणि दुर्गम भाग असलेल्या जव्हार तालुक्यात (Palghar) शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांवर घेतलेली मेहनत आणि विद्यार्थ्यांचे प्रयत्न फलदायी ठरत असून याभागाचा विकास घडत आहे, अश्यातच ज्ञानगंगा हायस्कूल मधील इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी प्राजक्ता सूर्यवंशी हिची भारत सरकार सायन्स अँड टेक्नॉलॉजी द्वारा आयोजित इन्स्पायर अवॉर्ड ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनात संपूर्ण जव्हार तालुक्यामधून जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. तिने सौर ऊर्जेचा वापर करून बहुउपयोगी छत्री तयार केली आहे. जिचा उपयोग भाजीविक्रते फळविक्रेते यांसारख्या लोकांना होणार आहे.
FD ला पर्याय असलेल्या 5 सरकारी योजना, करमुक्त कमाई आणि 8% पेक्षा जास्त व्याज
दरम्यान प्राजक्ता हिने विज्ञान प्रकल्पाबाबत भारावून जाऊन ज्ञानगंगा शाळेतील शिक्षक यांचे मार्गदर्शन घेत प्रकल्प सादर केला, परीक्षकांना या प्रकल्पाचे विशेष कौतुक वाटल्याने हा प्रकल्प आता जिल्हास्तरीय प्रदर्शनास निवडला आहे, त्यामुळे तालुका भरातून या विद्यार्थ्यांचे गोड कौतुक होत आहे. या विद्यार्थिनी ने वापरलेले कौशल्य कौतुकास्पद असल्यामुळे या शाळेचे अध्यक्ष मधुकर मुर्तडक यांच्या हस्ते प्राजक्ताचा सत्कार करण्यात आला. प्रकल्पासाठी शाळेच्या विज्ञान शिक्षिका दिपाली सोनवणे मुख्याध्यापक आणि इतर शिक्षक शिक्षकांची मार्गदर्शन लाभले असल्याचे प्राजक्ता हिने सांगितले.