Palghar: झाप ग्रामपंचायत मधे सरपंच आपल्यादारी

माय मराठी
2 Min Read

संदिप साळवे,पालघर (Palghar)

जव्हार तालुक्यातील झाप (Palghar)  ग्रामपंचायत मधे सरपंच आपल्यादारी कार्यक्रमाचा शुभारंभ लोकनियुक्त सरपंच एकनाथ दरोडा यांच्या हस्ते हेदोली येथे बुधवारी करण्यात आला.दरम्यान, प्रत्येक गावातील प्रत्येक घरात जावून तेथील लोकांशी संवाद साधून तेथील विकास कामासंदर्भात चर्चा केली, यात घरकुल योजना जल जीवन योजना ,नवीन प्रधानमंत्री घरकुल योजना सर्वे केले, नवीन जॉब कार्ड, नवीन रेशनकार्ड, घरपट्टी,प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची पाहणी केली, गावात गल्लीबोळात रस्ते करण्यासाठी पाहणी केली, संजय गांधी निराधार योजना नवीन लाभार्थी ज्याचे वय झाले आहे पन पेंशन प्रकरण केली नाहीत अशा लोकांचा सर्वे केला, लाडकी बहीण लाभार्थी काही यांना मिळत नाही त्यांचा सर्वे केला .

वैयक्तिक योजने संदर्भात माहिती दिली, प्रत्येक गावातील लोकानी आपल्या गावातील व वैयक्तिक अडचणी सांगितल्या यामध्ये 10 वी ,12 वी परीक्षा दिलेल्या मुलांसाठी मार्गदर्शन व त्यांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले पुढील शिक्षणासाठी मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत मदत करनार प्रत्येक गावातील लोकानी चांगला प्रतिसाद दिला.यावेळी लोकनियुक्त सरपंच एकनाथ दरोडा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की प्रत्येक दोन महिन्यातून सरपंच आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येईल.

यामधे जनतेकडून आलेल्या समस्या येत्या दोन महिन्यातच सोडवण्याचा प्रयत्न करू व लवकरच ग्रामपंचायत मधील सगळ्या गावात हा उपक्रम राबवून ग्रामपंचायत मधे जनता दरबार भरवून कॅम्प लावू यामधे रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, जॉबकार्ड,संजय गांधी निराधार व इतर योजनेचे फॉर्म या ठिकाणीच मिळतील यासाठी जनता दरबार भरवणार अशी माहिती दरोडा यांनी दिली यावेळी त्यांचे समवेत ग्रामपंचायत अधिकारी अमोल भोये,ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गवारी,विलास बागूल, रोजगार सेवक युवराज गवारी,ग्रामपंचायत शिपाई काशिनाथ तेलवडे उपस्थित होते.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more