पाच महिन्यांत 198 प्रवाशांवर गुन्हे (Police Action) नोंद – पोलिसांचा संयुक्त धडक मोहिम
रेल्वे प्रशासनाने दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव डबा उपलब्ध करून दिला असला, तरीही गर्दीच्या नावाखाली सामान्य प्रवासी या डब्यात अनधिकृतपणे प्रवास करतात. अशा प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठीडोंबिवली रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी संयुक्तरित्या कारवाईचे (Police Action) सत्र सुरु केले आहे.
बुधवार, २१ मे रोजी सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत डोंबिवली रेल्वे स्थानकात ही कारवाई (Police Action) राबवण्यात आली. या मोहिमेत विकलांग डब्यात अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या ३४ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या संयुक्त कारवाईमध्ये (Police Action) डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे, दोन अधिकारी, २० अंमलदार तसेच RPF चे दोन अधिकारी आणि पाच अंमलदार सहभागी होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ ते मे अखेर या पाच महिन्यांच्या कालावधीत विकलांग डब्यात अनधिकृतरित्या प्रवास करणाऱ्या एकूण १९८ प्रवाशांवर कारवाई (Police Action) करण्यात आली आहे.
डोंबिवली पोलिसांनी या मोहिमेमुळे दिव्यांग प्रवाशांचा हक्काचा डबा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
डोंबिवली (शंकर जाधव)