Pune: जिल्ह्यातील 9 रेल्वे स्थानकांचं रुपडं पालटणार

माय मराठी
2 Min Read

भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन योजना’अंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांमध्ये पुणे (Pune) जिल्ह्यातील 9 स्थानकांची निवड झाली असून, या स्थानकांचा चेहरामोहरा लवकरच पूर्णपणे बदलणार आहे. या योजनेचा भाग पुण्यातील दौंड व केडगाव ही दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके ठरली असून, तब्बल 56 कोटी 50 लाख रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.

उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या संदर्भात झालेल्या या योजनेची माहिती देण्यात आली. दौंड स्थानकाच्या उन्नतीसाठी44 कोटी , केडगावसाठी तर 12 कोटी 50 लाख इतका निधी मिळाला आहे.

आधुनिक वेटिंग लाउंज, फूड कोर्ट्स, हायजिनिक स्वच्छतागृहे, लिफ्ट्स व एक्सलेटर्स, तसेच डिजिटल सुविधा आणि अत्याधुनिक दळणवळण व्यवस्था प्रवाशांसाठी या निधीतून उभारली जाणार आहे. प्रवासाचा अनुभव अधिक सुकर, सुरक्षित आणि आरामदायक यामुळे होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील इतर स्थानकांनाही खालीलप्रमाणे निधी मंजूर

बारामती: 11 कोटी 40 लाख
आकुर्डी: 34 कोटी
चिंचवड: 20 कोटी 40 लाख
देहू रोड: 8 कोटी 50 लाख
तळेगाव: 40 कोटी 34 लाख
हडपसर: 25 कोटी
उरुळी कांचन: 13 कोटी

या योजनेंतर्गत सर्व स्थानकांचे सौंदर्यीकरण, सुविधा आणि कनेक्टिव्हिटी सुधारली जाणार असून, ही आधुनिकता रेल्वेच्या माध्यमातून प्रादेशिक विकासालाही गती देणार आहे.‘अमृत भारत स्टेशन’ योजना फक्त स्थानकांचा बदल नव्हे, तर प्रवाशांच्या अनुभवाचा नवा अध्याय आहे.

भारतीय रेल्वेने अमृत भारत स्टेशन योजना ही सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे, जी देशभरातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेचा उद्देश केवळ स्थानकांचे सौंदर्यीकरण करणे नाही, तर प्रवाशांना आधुनिक, सुरक्षित आणि सोयीस्कर सुविधा प्रदान करणे हा देखील आहे.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये:

सर्वसमावेशक विकास:
योजनेत स्थानकांचा केवळ देखावा नव्हे, तर प्रवेशद्वारे, प्रतीक्षालये, पार्किंग, लिफ्ट-एस्कलेटर, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, सोलर उर्जेचा वापर अशा सुविधा वाढवण्यावर भर.

भविष्यातील गरजांसाठी तयार:
स्टेशन वाढती प्रवासी संख्या आणि भविष्यातील तांत्रिक गरजा लक्षात घेऊन विकसित केली जात आहेत.

स्मार्ट स्टेशन संकल्पना:

डिजिटल सिग्नेज, WiFi, CCTV सुरक्षा, आधुनिक इन्फॉर्मेशन डिस्प्ले, कचरा व्यवस्थापन यांचा समावेश.

स्थानिक संस्कृतीचा समावेश:
संस्कृती, शिल्पकला स्टेशनच्या डिझाइनमध्ये स्थानिक इतिहास, आणि स्थापत्य यांचा समावेश केला जातो.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more