Raigad Fort : किल्ले रायगडावर लाखो शिवभक्तांचा जोश कायम, अशी आहे उद्याची तयारी

माय मराठी
2 Min Read

किल्ले रायगडावर (Raigad Fort) लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत तारखेनुसार ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा प्रंचड उत्साहात साजरा करण्यात आला होता. उद्या देखील (९ जून ) शिवभक्तांचा तोच उत्साह आणि लाखोंच्या उपस्थितीत दुर्गराज किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. राज्याचे मुख्यंत्री उपमुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री या दिव्य सोहळ्यास उपस्थित रहाणार असून राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले आणि त्यांचे सर्व सहकारी सोहळ्याची जय्यत तयारी करीत आहेत. आज दिनांक ८ जून पासून किल्ले रायगडावर विविध धार्मिक सांस्कृतीक कार्यक्रमानी शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात झाली. भरतशेठ गोगावले यांच्या निमंत्रणावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मस्यविभाग व बंदरे मंत्री निलेश राणे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर राज्यातून लाखो शिवभक्त या सोहळ्याला आपली उपस्थिती लावणार आहेत.

रविवारी सांयकाळी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस अभिवादन करून शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ झाला. गडावरील नगारखाना येथे गडपूजन यानंतर सायंकाळी ७ वाजेनंतर होळीच्या माळावर ढोलवादन लेझिम वादन, ढाल मृदूंगावर गजर डांगपट्टा तलवारबाजीच प्रात्यक्षिक करण्यात आली. शिवराज्याभिषेक दिनी सकाळी ७ वाजता नगारखाना येथे ध्वज पूजन व ध्वजारोहन राजसदरेवर शाहिरी कार्यक्रम, ९.३० वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक असे विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात येणार आहे. या उत्सवाला किमान तीन लाख शिवभक्त उपस्थित राहणार असल्याने किल्यासह पाचाड येथे हजारो पोलिस तैनात असणार आहेत. १२ वाहनतळ १२ मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. शिवभक्तांना भोजनासाठी पाच हजार किलो तांदूळ पाण्याच्या १ लाख बॉटल देण्यात येणार आहेत.

प्रशासनाकडून शिवभक्ताकरिता किल्ले रायगड आणि परिसरात सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णवाहिका पिण्याच्या पाण्याची सोय आदी करण्यात आले आहे. रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा पाचाड येथे जमलेल्या शिवभक्तांना पाहता यावा यासाठी प्रशासनाकडून स्क्रिनदेखील लावण्यात आल्या आहेत.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more