Raigad:क्रिकेटच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी एमसीए कटीबद्ध आहे

माय मराठी
5 Min Read

रायगड (Raigad) जिल्हा क्रिकेट असोसिएशन करत असलेले काम कौतुकास्पद

एमसीए तर्फे प्रत्येक जिल्हा क्रिकेट संघटनेला प्रत्येकी ७५ लाख रुपयांचे अनुदान देणार – रोहित पवार

पेण दि. १२ (अरविंद गुरव) – आज पेण नगरपरिषद येथील शरद पवार भवन येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व रायगड (Raigad)क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महिना अखेरीस होऊ घातलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांमध्ये रायगड रॉयल्स चा संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धांमागची भूमिका, त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेटला होणारा फायदा, संघमालकांची भूमिका, रायगड क्रिकेट असोसिएशन करत असलेले काम या या विषयांवर पत्रकार परिषद घेण्यात आली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रोहित दादा पवार यांनी यावेळी पत्रकारांना संबोधित केले.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेट विकासासाठी ७५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार असून रायगड जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी एमसीए सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे तसेच येणाऱ्या काळात जिल्हा क्रिकेट असोसिएशनला अजून भरीव निधी उपलब्ध करून देणार आहे. पायाभूत सुविधांचा अजून विकास करण्यासाठी एमसीए कटिबद्ध असून रायगड क्रिकेट संघटनेला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे एमसीएचे संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

या प्रसंगी माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार रवीशेठ पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे, पेण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे, तसेच अपेक्स कौन्सिल सदस्य श्री. राजू काणे, श्री. सुशील शेवाळे, श्री. अजय देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजिंक्य जोशी, रायगड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक, रायगड रॉयल्स संघमालक अलीशा बाहेती, रायगड रॉयल्स संघाचे संचालक पराग मोरे, रायगड रॉयल्स पुरुष व महिला संघाचे कर्णधार ऋषभ राठोड व किरण नवगिरे, तसेच संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी रोहित पवार म्हणाले की, “महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गुणवान क्रिकेट पटूना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळणार असून या स्पर्धेमुळे भविष्यात भारतालाही गुणवान क्रिकेटपटू मिळणार आहेत. सलग तिसऱ्या वर्षी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या यशात सर्व संघांच्या मालकांचा मोलाचा वाटा आहे. एमपीएल व डब्ल्यूएमपीएल हे केवळ स्पर्धात्मक मंच नसून, एक परिवार आहे. संघमालक, खेळाडू, पदाधिकारी, टेक्निकल टीम आणि सपोर्ट स्टाफ यांचे परिश्रम या यशामागे आहेत. रायगड क्रिकेट असोसिएशन श्री अनिरुद्ध पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांची सर्व कमिटी रायगड क्रिकेटच्या विकासासाठी उत्तम प्रयत्न करत आहेत, या गोष्टीचा मनस्वी आनंद आहे. आमचा दृढ विश्वास आहे की येत्या काळात एमपीएल व डब्ल्यूएमपीएल च्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू महाराष्ट्राकडून व पुढे जाऊन देशासाठी खेळतील.”

स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) व स्टार स्पोर्ट्स २ (Star Sports 2) या वाहिन्यांवर करण्यात येणार आहे, ज्यामुळे ही स्पर्धा राज्यासह संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

महाराष्ट्र क्रिकेट संघटना आगामी हंगामात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर स्वतःची अकादमी सुरु करणार असून, मुख्य अकादमी अजय शिर्के यांच्या नावाने पुण्यातच सुरु करण्यात येईल. त्यानंतर जिल्ह्यात चार विभागीय अकादमी सुरु करण्यात येणार असून, यातील एक रत्नागिरीत दापोली येथे झोनल अकॅडमी सुरू करण्यात येणार आहे.

ज्याप्रमाणे आयपीएल स्पर्धेमुळे देशातील अनेक ग्रामीण भागातील गुणवान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामन्यांची दारे खुली झाली, त्याप्रमाणेच एमपीएल स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार असून त्यांच्यासाठी भविष्यात अनेक संधी निर्माण होणार आहेत. – माजी आमदार अनिकेत तटकरे

स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा संघमालक असल्याचा अभिमान वाटतो. तसेच रायगड व महाराष्ट्रात अनेक होतकरू पुरुष व महिला खेळाडू असून या खेळाडूंना आमच्या फ्रँचायझीच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार असल्यामुळे एक समाधानाची भावना आहे. – रायगड रॉयल्स संघ मालक अलिशा बाहेती

या वर्षीच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग लिलावासाठी ४०९ पुरुष खेळाडू आणि २४९ महिला खेळाडू नोंदणीकृत होते, ज्यामधून संघमालकांनी आपापल्या संघाचा बॅलन्स व गरजांनुसार संघासाठी खेळाडूंची निवड केली.

या हंगामात एमपीएल मध्ये ६ संघ आणि डब्लूएमपीएल मध्ये ४ संघ सहभागी झाले असून, ही स्पर्धा येत्या मे व जून २०२५ मध्ये एमसीए गहुंजे इंटरनॅशनल स्टेडियम, पुणे येथे खेळविण्यात येणार आहे.

 

एमपीएल २०२५ सहभागी संघ:
1. 4S पुणेरी बाप्पा
2. PBG कोल्हापूर टस्कर्स
3. रत्नागिरी जेट्स
4. ईगल नाशिक टायटन्स
5. सातारा वॉरियर्स
6. रायगड रॉयल्स

डब्लूएमपीएल २०२५ सहभागी संघ
1. पुणे वॉरियर्स
2. रत्नागिरी जेट्स
3. पुष्प सोलापूर

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more